Koregaon Bhima : अभिवादन दिनानिमित्त विजयस्तंभस्थळी ३१ डिसेंबर मध्यरात्रीपासूनच पारंपरिक कार्यक्रम; विजयस्तंभास फुलांची सजावट

Koregaon Bhima : भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी विजयस्तंभाला भेट दिल्याच्या घटनेला २०२७ ला १०० वर्षे होत असल्याने शतकपूर्तीनिमित्त एक कोटी भीमअनुयायांची मानवंदना अर्पण करण्यासाठी शाहु-फुले-आंबेडकर विचाराच्या विविध पक्षसंघटनांच्या माध्यमातून भव्य अभिवादन सप्ताहाचे आयोजन करण्यासाठी कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा समिती पुढाकार घेणार असल्याचे सांगून या शतकपूर्ती कार्यक्रमाची तयारी यावर्षीपासूनच करण्यात येत असल्याचे अध्यक्ष सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.

तर यावर्षीच्या विजयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त पेरणे (ता. हवेली) येथे प्रशासनाने जय्यत तयारी केली असून ३२ डिसेंबरला मध्यरात्रीपासूनच सुरु होणाऱ्या पारंपरिक कार्यक्रमासह अभिवादनाकरीता अनुयायांनी निर्धास्तपणे यावे, असे आवाहन विजयस्तंभ कोरेगाव भिमा विजय रणस्तंभ सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

UK. Prame Minister London Home

यावर्षी विजयस्तंभ अभिवादन दिनानिमित्त प्रशासनाने केलेल्या तयारीसह होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती सर्जेराव वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचितानंद कडलक, निलेश गायकवाड, राजू विटेकर, सिद्धार्थ गायकवाड, बाळासाहेब भालेराव, विशाल सोनवणे, विवेक बनसोडे व इतर पदाधिकारीही उपस्थित होते.

सन २०२७ मधील शतकपूर्ती कार्यक्रमाच्या पार्श्वभुमीवर शतकपूर्ती कार्येक्रमाची तयारी म्हणून विजयस्तंभस्थळी अभिवादनासाठी येणाऱ्या बांधवांसाठी येत्या वर्षभरातच कायमस्वरूपी पार्किंग, निवास, वीज, पाणी, आरोग्य, संग्रहालये, तसेच अन्य सोयीसुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, यासाठी समिती शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान अभिवादन दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती त्यांनी दिली. यामध्ये सोमवारीच (ता.३०) विजयस्तंभाची सजावट पुर्ण करण्यात येणार असून ३१ डिसेंबरला समता सैनिक दल पुणे जिल्हा अंतर्गत मैदानी स्पर्धा होणार आहेत.

तर ३१ डिसेंबरला रात्री १२ वाजता कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा संघाच्या वतीने विजयोत्सवानिमित्त रोषणाई केली जाणार असून सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या उपस्थितीत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व कोरेगाव भिमा विजयरणस्तंभ सेवा संघ यांच्या वतीने सामुदायिक बुद्ध वंदना होईल. तर मध्यरात्री ते पहाटे ५ वाजेपर्यंत भन्ते ज्ञानज्योती यांची भन्तेगणासह धम्मदेशना, धम्मपठण होईल.

तसेच शौर्य पहाटे निमित्त पहाटे ६ वाजता भिमशाहीर मेघानंद जाधव, विपीन तातड, तसेच अजय देहाडे यांचा प्रबोधनपर भिमगिताचा कार्यक्रम होईल. सकाळी ७ ते ८ या वेळात भारतीय बौध्द महासभा यांच्या वतीने बुद्धवंदना तसेच कोरेगाव भीमा विजय रणस्तंभ सेवा संघ यांच्या वतीने आमदार माऊली कटके यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सन्मान व स्वागत होईल.
सकाळी ८.३० वाजता सेवानिवृत्त महार रेजिमेंटची परेड, ९ ते १२ या वेळात समता सैनिक दलाचे बँड पथकासह कवायत संचलन व सलामी देण्यात येईल. यावेळी भीमराव आंबेडकर, सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तर दुपारनंतर रिपब्लिकन विद्यार्थी सेनेची मानवंदना, अभिवादन सभा व प्रबोधनकारक कार्यक्रम होतील. या निमित प्रथमच आमदार माऊली कटके यांनी ५० हजार पेक्षा अधिक अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली असून अभिवादन कार्यक्रमानिमित्त शासनाने विकसित केलेल्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून सर्व सोयी सुविधांची माहिती येणाऱ्या अनुयायांनी घ्यावी, तसेच प्रशासनाला सहकार्य करुन शांततेत अभिवादन करावे, असेही आवाहन सर्जेराव वाघमारे व समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply