
Ratnagiri : कोकण रेल्वे मार्गावर धावणारी दादर रत्नागिरी पॅसेंजर ही गाडी कायमची बंद करून त्या ठिकाणी आता उत्तर प्रदेशात जाणारी दादर गोरखपुर एक्सप्रेस सोडण्यात आल्याने कोकणवासियांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कोरोना कालावधीत 'दादर-रत्नागिरी' ही गाडी बंद करून ती 'दिवा-रत्नागिरी पॅसेंजर' म्हणून सोडण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही गाडी सुरू करण्यासाठी कोकणातील प्रवाशांकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता मात्र कोकणवासियांच्या या मागणीला केराची टोपली दाखवण्यात आली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका खासदारांना दिलेल्या पत्रात दादर-गोरखपुर गाडी नियमित स्वरूपात करण्यात आल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
कोरोना काळात एक्सप्रेस बंद
मुंबईतील दादरवरून रत्नागिरी मध्ये येण्यासाठी ही एकमेव गाडी सुरू होती ती कोरोना कालावधीत बंद करण्यात आली तेव्हापासून ती गाडी आजवर सुरू करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र दादर रत्नागिरी गाडी अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. दादर-रत्नागिरी गाडीला मोठी मागणी आहे मात्र या मागणीची दखल अद्याप रेल्वे प्रशासनाने घेतलेले नाही. सध्या त्याऐवजी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेस सोडण्यात येते. पण दादर हे मुंबईच्या केंद्रस्थानी असून या स्थानकावर पोहोचणे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी सोपं आहे.
दादर रत्नागिरी गाडी ज्या वेळेला बंद करण्यात आली त्यावेळेला लोकल गाड्यांना अडथळा होत असल्याचे प्राथमिक कारण देण्यात आलं होतं. खासदार रविशंकर शुक्ला यांना दिलेल्या पत्रात दादर गोरखपुर ही गाडी आता नियमित स्वरूपात करण्यात आल्याचे स्पष्ट झाल आहे. यापूर्वी ही गाडी हंगामी स्वरूपात चालवली जात होती. महाराष्ट्रातील गाड्यांना दादर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही किंवा कोणत्याही तांत्रिक कारण देत कोकणात येणारी गाडी बंद करण्यात आली मात्र महाराष्ट्र बाहेर उत्तर प्रदेशात जाणाऱ्या गाडीला वाट करून देण्यात येत असल्याने कोकणवासियांमध्ये नाराजी असल्याचं मत रेल्वेचे अभ्यासक अक्षय महाबदी यांनी व्यक्त केल.
दादर-रत्नागिरी सेवा बंद करण्यामागचं कारण काय?
मिड डमधील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र अक्लेकर यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये या मागील कारण स्पष्ट केलं आहे. मध्ये रेल्वेवर दादर-रत्नागिरी एक्सप्रेस चालवताना एक ऑपरेशनल अडचण येते. कोकणातून येणारी ही एक्सप्रेस जेव्हा दिवा आणि विद्याविहार स्थानकांजवळ मुंबईतील उपनगरिय रेल्वे मार्गांवर प्रवेश करते तेव्हा एकाच वेळी सुमारे सहा लोकल थांबतात. अप आणि डॉऊन या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी तीन लोकल थांबवल्या जातात. यामुळे लोकलचं वेळापत्रक विसकळीत होतं. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
शहर
- Pune : पुढील दोन दिवस पावसाची शक्यता; राज्यातील 21 पेक्षा अधिक जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या कसं असेल हवामान
- Pune : लेह-लडाखहून परतताना दुर्दैवी अपघात; पुण्यातील तीन मित्रांचा मृत्यू, विमानाने परतलेला चौथा मित्र धक्क्यात
- Pune : पुण्यातील वाहनधारकांसाठी आता नवीन नोंदणी क्रमांकांचे पर्याय उपलब्ध; इंग्रजीतील तीन अक्षरांची सिरीज सुरू करणारे देशातील दुसरे शहर म्हणून पुण्याचा मान.
- एन. रघुरामन यांचा कॉलम:एआय अद्याप कामाच्या ओझ्यापासून सुटका करू शकलेले नाही
महाराष्ट्र
गुन्हा
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नूतन वर्ष आध्यात्मिक साधनेसाठी खूप अनुकूल
- आशुतोष वार्ष्णेय यांचा कॉलम:इराणमधील युद्ध कधी अन् कसे बरे संपेल?
- आरती जेरथ यांचा कॉलम:ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मतदार यादीवरून वादंग
- अर्घ्य सेनगुप्ता-स्वप्निल त्रिपाठी यांचा कॉलम:धार्मिक व्यवस्थेसाठीदेखील कोर्टाचा आधार कशामुळे?
राजकीय
- मिरज पंचायत समितीत काँग्रेसची बाजी, भाजपच्या बालेकिल्ल्यात आघाडीचा धक्का
- आरती जेरथ यांचा कॉलम:‘आप’ नेत्यांच्या सुटकेनंतर काँग्रेस पक्ष चिंताक्रांत का?
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
इतर
- सरकार तुमचे बँक खाते गोठवू शकत नाही: आर्थिक संकटाच्या व्हायरल दाव्याची पडताळणी
- नाशिकमध्ये निवडणुकीतील पराभव जिव्हारी, राजकीय नेत्याचा युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला
- राज्यात उन्हाचा कडाका वाढला: उष्माघातापासून बचावासाठी आरोग्य विभागाकडून 'अॅडव्हायजरी' जारी; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
- Pune- पुणे महापालिकेचा मोठा निर्णय! २३ गावांच्या विकासासाठी ९५४ कोटींचा ‘बूस्टर डोस’
मनोरंजन
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
विडियो गॅलेरी

देश विदेश
- Mumbai : महाराष्ट्रात एलपीजी संकट! पश्चिम आशियातील युद्धामुळे गॅस पुरवठा विस्कळीत; गॅस एजन्सींना पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
- नांदेडच्या औद्योगिक शिरपेचात मानाचा तुरा! ४,२५० कोटींचा हेलिकॉप्टर प्रकल्प जाहीर; हजारो तरुणांना मिळणार रोजगार
- LPG टंचाई: सिलिंडर वाहनांना पोलीस सुरक्षा द्या आणि तात्काळ 'कंट्रोल रुम' उभारा; राज्य सरकारचे जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
- गॅस टंचाई हाताळण्यासाठी केंद्र सरकार सरसावले: हॉटेल्सना पर्यायी इंधन, राज्यांना अतिरिक्त रॉकेल

























Subscribe to my channel



