Konkan Railway : रस्त्यांची दुर्दशा अन् रेल्वेही ५ मिनिटात फुल्ल; मग गणपतीला कोकणात जायाचं कसं? प्रवाशांचा सवाल

 

Konkan Railway :कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांची मोठी संख्या असते. ही बाब लक्षात घेऊन विशेष गाड्या कोकणात सोडल्या जाणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली खरी पण नागरिकांना मात्र तिकीटच मिळत नाहीये. तिकीट बुकिंग करण्यासाठी गेलेल्यांना नागरिकांना तिकीट ने घेता खाली हातच परत यावं लागत आहे. मात्र अवघ्या पाच मिनिटात गाड्या कशा फुल होतात, असा संतप्त सवाल प्रवाशी करत आहेत.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्याकरता रेल्वे तिकिटांची बुकिंग सुरू झालीय. मात्र काही मिनिटात रेल्वे तिकीट बुकिंग फुल्ल होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. इतक्या जलदगतीने तिकीट बुकिंग फूल होते तरी कशी? यात काही काळाबाजार होत आहे का?असा सवाल नागरीक करत आहेत. आता तिकिट बुकिंग सुरू झाली तितक्यात दोन दिवसात कसं फुल होतं.

Wayanad landslides : केरळच्या वायनाडमध्ये भूस्खलनामुळे विध्वंस; ढिगाऱ्याखाली दबून ५० हून अधिक जणांनी गमावला जीव

यामागे काही काळाबाजार आहे का? रेल्वे कर्मचारी लगेच कसं तिकीट बुकिंग फूल झाल्याचं म्हणून शकतात? तिकीट बुकिंगसाठी रांगेत उभे राहूनही तिकीट मिळत नाहीये, मग रेल्वे सेवांचा उपयोग काय? गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी खासगी कार किंवा बसने जाण्याचा विचार केला तर रस्त्यांची स्थिती खराब आहे. मग कोकणात जायचं कसं असा सवाल रेल्वे प्रवाशी श्रृती श्रुंगे यांनी केलाय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply