Kolhapur Wall Collapse News : कोल्हापुरात भिंत कोसळून महिलेचा मृत्यू, दुसऱ्या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरु

Kolhapur  : कोल्हापूरमध्ये सततच्या पावसामुळे एक दगडी भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आणखी एक महिला जखमी असून तिच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. शहरातील केशवराव भोसले आणि खासबाग मैदान यामध्ये असणारी दगडी भिंत आज अचानक कोसळली.

केशव भोसले इथे एक कार्यक्रम सुरू होता. यावेळी दोन महिला या भिंतीजवळ शौचालयास गेल्या होत्या. यावेळी अचानक खास बाग कुस्ती मैदानाच्या भिंतीचा काही भाग त्यांच्या अंगावर कोसळला आणि या दोन्ही महिला मातीच्या ढिगार्‍यात अडकल्या होत्या. (

मात्र या महिलांसोबत असणाऱ्या मुलीने घडलेली घटना स्थानिक नागरिकांना सांगितली. त्यानंतर स्थानिकांनी आणि महापालिका प्रशासन, अग्निशामन दलाच्या जवानांनी ढिगार्‍यात अडकलेल्या दोन्ही महिलांना बाहेर काढलं.

Pune Bus Stop: बिबवेवाडी बस थांबा तीन वर्षापासुन प्रतिक्षेतच

छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दोन्ही महिलांवर उपचार सुरू होते. मात्र अश्विनी यादव (वय ५९) या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर दुसरी महिला संध्या तेली यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply