Kolhapur News : रस्त्यांच्या कामातील निकृष्टता खपवून घेणार नाही : हसन मुश्रीफ, काेल्हापूरात 100 कोटींच्या कामांना प्रारंभ

Kolhapur News : रस्ते प्रकल्पातील ठेकेदारांनी खराब रस्ता केल्यास त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आज (मंगळवार) काेल्हापूरकरांनी लाेकप्रतिनिधींना केली. यावेळी लाेकप्रतिनिधींनी देखील रस्ते चांगलेच झाले पाहिजे असा सूर आवळला. कोल्हापूरतील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला हाेता. आज रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश क्षीरसागर  आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. 

कोल्हापूर शहरासह संपूर्ण परिसरात रस्त्यांची चाळण झालेली आहे. खराब रस्त्यांमुळे कोल्हापूरकरांना वाहन चालवणं मुश्किल झालं होतं. या सर्वांचा रोष लोकप्रतिनिधींवर निघत होता. याच पार्श्वभूमीवर राज्य नियोजन मिळण्याचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत कोल्हापुरातील रस्त्यांसाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला होता.

Sadabhau Khot News : सदाभाऊ खोत यांच्या मागणीनं लोकसभा निवडणुकीआधी शिंदे गटाचं टेन्शन वाढलं

मात्र प्रत्यक्षात या रस्त्यांच्या कामाला सुरुवात झाली नव्हती. अखेर आज बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित अशा 100 कोटी रुपयांच्या कोल्हापूर शहरातील रस्ते प्रकल्पाच्या कामाला मुहूर्त मिळाला.

कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, कोल्हापूर शहराच्या आमदार जयश्री जाधव यांच्या हस्ते रस्ते प्रकल्पाचा शुभारंभ झाला.

हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात येणार आहे असे लाेकप्रतिनिधींनी नमूद केले. कोल्हापुरातील हे रस्ते दर्जेदार व्हावेत अशी अपेक्षा पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केली. तर रस्ते प्रकल्पातील ठेकेदारांनी खराब रस्ते केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील केली गेली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply