Kolhapur News : दगडी मूर्तींची अघोरी पूजा; कोल्हापूर जिल्ह्यातील अंधश्रद्धेचा प्रकार

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील बोरवडे गावच्या हद्दीत असणाऱ्या पठारावरील शिवारात दगडी मुर्त्यांची अघोरी पूजा केल्याचा प्रकार समोर आला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास काही अज्ञातांनी ढोल वाजून ही पूजा केल्याची माहिती ग्रामस्थांची दिली. 

कोल्हापूर जिल्ह्यातील बोरवडे गावाच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे काही अज्ञातांनी आठ दगडी मुर्त्या रंगवून उभ्या केल्याचे निदर्शनास आले आहे. यातील काही मुर्त्यांना भगवे फेटे व काहीना साड्या नेसून त्यांना हार घालून त्यांची पूजा केल्याचे उघड झालेला आहे. हा संपूर्ण प्रकार अंधश्रद्धेतून झाल्याची गावात सध्या चर्चा रंगलेली आहे. मध्यरात्री गावकऱ्यांना ढोल वाजल्याचे आवाज सुद्धा आले होते.

Bandra - Worli Sea Link : वांद्रे-वरळी सी लिंकवरून तरुणाने मारली उडी; आत्महत्येचं कारण काय?

 

बाहेरून आणल्या मुर्त्या 

मध्यरात्री ढोल वाजून या पठारावर या मुर्त्या ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली. यापूर्वी या पठारावर अशा दगडी स्वरूपाच्या मुर्त्या नव्हत्या. बाहेरून कोणीतरी आणून मध्यरात्री या मुर्त्या लावून त्या ठिकाणी त्यांची पूजा केल्याचं पाहायला मिळत आहे. मुर्त्यांच्या समोर कुंकू, हळद, हार, फुले आणि मूर्तींच्या पाठीमागे एक भगवा झेंडा लावल्याचेही निदर्शनास आलेला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे शेतकरी वर्गांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply