Kolhapur News : बिहारची 63 मुलं कोल्हापूरात, आज-याला निघालेला ट्रक फिल्मी स्टाईलने पाेलीसांनी घेतला ताब्यात

Kolhapur News : बिहार राज्यातील मुस्लिम समाजातील 61 मुलांना घेऊन जाणारा ट्रक कोल्हापूर पोलिसांनी पकडला. या ट्रकमध्ये सात ते चाैदा वयोगटातील 61 मुस्लिम समाजातील लहान मुलं आहेत. बिहार येथून रेल्वेतून 63 मुलं काेल्हापूरात आली. बिहार येथून आलेल्या मुलांपैकी दाेन मुलं बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी संशय व्यक्त करुन पाेलिसांना माहिती दिली. त्यामुळे पाेलिसांनी ट्रक ताब्यात घेऊन मुलं कशासाठी आणली गेली याची चाैकशी सुरु केली आहे. 

काेल्हापूर पाेलिसांनी ट्रकच्या चालकाकडे चाैकशी केली असता त्याला समर्पक उत्तरं देता आलेली नाहीत. प्राथमिक माहितीनूसार ही सर्व मुलं बिहारमधून काेल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा येथे सणाऱ्या एका मदरशात शिक्षणासाठी आणली गेली आहेत. पाेलिसांनी संबंधित शिक्षण संस्थेकडे याबाबत विचारणा केली असताना संस्थेतून देखील ही सर्व मुलं शिक्षणासाठी आणल्याचे सांगितले गेले आहे.

हिंदुत्ववादी संघटनेचे सदस्य विजेंद्र माने म्हणाले या ट्रक चालकाकडे चाैकशी केली असता ताे घटनास्थळावरुन पळून गेला. त्यातील अन्य एकाने ही मुलं मदरशा येथे नेण्यात येत असल्याचे सांगितले गेले. या मुलांकडे असणारी रेल्वेचे तिकीट आणि ते सांगत असलेले येण्याचे ठिकाण यामध्ये तफावत आढळली. हे सर्व विद्यार्थी आहेत असे सांगितलं गेले परंतु तसे वाटत नाही. त्यांच्याकडे याेग्य कागदपत्रं नव्हती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply