Kolhapur Loksabha Election : कोल्हापूर लोकसभेसाठी भाजपचा मोठा डाव! शाहू महाराज छत्रपतींना समरजितसिंह घाटगे आव्हान देणार?

Kolhapur Loksabha Election : कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी निश्चित झाली आहे. शाहू महाराज छत्रपती हे काँग्रेसच्या चिन्हावर लोकसभेच्या रिंगणात उतरतील.

शाहू महाराज यांच्या उमेदवारीमुळे महायुतीसमोर मोठे आव्हान उभे केल्याची चर्चा रंगली होती. अशातच आता छत्रपती शाहू महाराजांना शह देण्यासाठी भाजपने मोठा डाव टाकला असून त्यांच्या विरोधात शाहू जनक घराण्याचे वंशज समरजीत घाटगेंना उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे.

छत्रपती शाहू महाराजांविरोधात सरमजीत घाटगे?

महाविकास आघाडीच्या वतीने कोल्हापूरच्या जागेसाठी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाची चर्चा पुढ आणली जात आहे. अशातच आता महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्या नावाऐवजी आता भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांचे नाव पुढे आल्याची चर्चा आहे. या चर्चेवर समरजितसिंह घाटगेंनी मात्र यावर प्रतिक्रिया देणं टाळले आहे. आपण भाजपचा प्रोटोकॉल पाळणारा व्यक्ती असल्याचे सांगत सध्या त्यांनी या विषयावर मौन बाळगले आहे.

Beed News : सहाय्यक पोलीस निरीक्षकाची रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या; बीडमधील खळबळजनक घटना

संजय मंडलिकांचा पत्ता कट?

मागील अनेक दिवसांपासून कोल्हापूरचे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे तिकीट कापले जाईल अशी चर्चा सुरू आहे. एकीकडे मंडलिक आपणच उमेदवार असेल असं सांगत असले तरी दुसरीकडे मात्र कोल्हापुरच्या जागेबाबत वरिष्ठ पातळीवरती अनेकांनी भाजपचे नेते समरजितसिंह घाटगे  यांच्या नावाला पसंती दिल्याची सुद्धा माहिती समोर आली आहे.

दरम्यान, शाहू महाराज छत्रपती यांच्या विरोधात शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांना मैदानात उतरवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. समरजित घाटगे यांनी उमेदवारी दिल्यास दोन्ही राज घराण्यात काटे की टक्कर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ऐनवेळी समरजित घाटगे यांचं नाव चर्चेत आल्याने कोल्हापूर लोकसभे बाबत उत्सुकता वाढली आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply