Kolhapur GBS : पुणे, मुंबईनंतर कोल्हापुरात जीबीएसचा पहिला बळी, ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

 

Kolhapur GBS  : पुणे, मुंबईचं टेन्शन वाढवणाऱ्या जीबीएसने कोल्हापुरमध्ये शिरकाव केला. जीबीएसने कोल्हापूरमध्ये पहिल्या बळी घेतला. ६० वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून या महिलेवर रुग्णालयात उपचार सुरू होते. या महिलेचा आज उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे कोल्हापूरमध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातवरण पसरले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या कोल्हापूर जिल्ह्यात जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ६० वर्षीय महिलेवर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. जीबीएसने मृत्यू झालेली महिला चंदगड तालुक्यातील आहे. राज्यामध्ये आतापर्यंत जीबीएस आजारामुळे ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply