Kolhapur Band : कोल्हापुर राड्यावर पोलिस अधिक्षकांची महत्त्वाची अपडेट; घटनेत अल्पवयीन मुलांचा समावेश

Kolhapur Band : काही हिंदुत्ववादी संघटनांनी पुकारलेल्या कोल्हापूर बंदला काल (बुधवार) हिंसक वळण लागले. निदर्शने करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमलेले हिंदुत्ववादी कार्यकर्ते तेथून विविध भागांमध्ये पांगले आणि शहरात १३ ठिकाणी दगडफेकीचे प्रकार घडला. दरम्यान, झालेल्या घटनेवर पोलिस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी मोठी अपडेट दिली आहे.

कालापासून ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील ३ जण अल्पवयीन आहेत. स्टेटस ठेवणारे ५ जण अल्पवयीन आहेत. या घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असं पोलिस अधिक्षक यांनी सांगितलं आहे. 

कालचा राडा हे पोलिसांचं अपयश नव्हे....

झालेल्या घटनेवर पोलिस अधिक्षकांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाच्या अपडेट्स दिल्या. ५० हून अधिक जणांना ताब्यात घेतल आहे. ताब्यात घेतलेले आरोपी हे महाविद्यालयीन आहेत. रात्री १२ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद आहे. आरोपींच्या मेलचा तपास सुरु आहे. सर्व विद्यार्थ्यांना आत न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. एकाचा स्टेटस अन्य सर्वांनी कॉपी केला. सीसीटीव्ही फुटेज काल आम्हाला प्राप्त झालं आहे. 

यामध्ये काही अल्पवयीन मुलं आहेत. त्यांना बालन्यायालयात हजर करण्यात आलं आहे. कालच्या राड्यात शहराबाहेरचं कुणी आढळलं नाही. कालापासून ३६ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यातील ३ जण अल्पवयीन आहेत. स्टेटस ठेवणारे ५ जण अल्पवयीन आहेत. या घटनेला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच, ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलं आहे. कालचा राडा हे पोलिसांचं अपयश नव्हे, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply