Rain Update : आंबा घाटात दरड काेसळली, साता-यात बरसला; काेयना धरणावर 1996 च्या स्थितीची चिंता

Kokan Rain Update : कोकणात मान्सून सक्रीय झाला आहे. आज (शनिवार) सकाळपासूनच पावसाच्या दमदार सरी रत्नागिरी शहरात कोसळायला सुरुवात झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळताहेत. या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे.

आंबा घाटात दरड काेसळली

दरम्यान पहिल्याच पावसात आंबा घाटात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. आंबा घाटातील प्रसिद्ध गायमुख या ठिकाणी श्री गणेश मंदिराच्या छतावर दरड काेसळली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. सध्या आंबा घाटातील वाहतुक सुरळीत सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

कोयना धरण परिसरात सुरु

कोयना धरण परिसरात मान्सूनने हजेरी लावलेली आहे. शुक्रवार दुपारपासूनच या भागात पावसाला सुरुवात झाली. आज देखील धरण परिसरात पावसाचा जोर कायम आहे. पावसामुळे धरण परिक्षेत्रात 14 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. नवजा या ठिकाणी 32 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरला मात्र पाच मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे. ही आकडेवारी मान्सूनच्या आगमनाची चाहूल असल्याचे दर्शविले जात आहे

साता-यात पावसाची हजेरी

सातारा शहरात देखील आज (शनिवार) पावसाने दमदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे बाजारपेठेत एकच धांदल उडाली. अनेकांनी पावसापासून बचाव व्हावा यासाठी माेठ्या झाडांचा आधार घेतला.

काेयनेत दाेन वेळा झाली कमी साठ्याची नाेंद

कोयना धरणात सध्या 10.68 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. या धरणात उपयुक्त पाणीसाठा हा पाच टीएमसी इतका आहे. यापु्र्वी जून 1996 मध्ये धरणात 10.66 टीएमसी तर जून 2019 मध्ये 10.75 टीएमसी इतका कमी पाणी साठा हाेता अशी नाेंद असल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.

दरम्यान सध्या काेयना धरणात पाऊस सुरु असल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ हाेणार आहे हे निश्चित.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply