Kokan Railway : मुंबई ते कन्याकुमारी दरम्यान कोकण रेल्वे मार्गे विशेष ट्रेन!

मुंबई - मध्य रेल्वेने नाताळच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते कन्याकुमारी दरम्यान कोकण रेल्वेमार्गे विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळालेला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक 01461मुंबई ते कन्याकुमारी विशेष एक्सप्रेस 22 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि कन्याकुमारी येथे दुसऱ्या दिवशी रात्री 11.20 वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01462 विशेष कन्याकुमारी येथून 24 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 2.15 वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री 11 वाजता पोहोचेल.

या दोन्ही ट्रेन दादर, ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासारगोड, कन्नूर, थलास्सेरी, कोझिकोड, तिरूर, शोरनूर, थ्रिसूर, एर्नाकुलम, कोट्टायम, तिरुवल्ला, चेंगन्नूर, कायनकुलम, कोल्लम जंक्शन, तिरुवनंतपुरम सेंट्रल, कुलितुराई आणि नागरकोइल जंक्शन स्थानकांवर थांबणार आहे. या विशेष गाड्यांचे आरक्षण सर्व रेल्वे स्थानकांच्या आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू झाले आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply