KL Rahul Statement : लखनऊच्या पराभवानंतर केएल राहुल भडकला! या खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर

KL Rahul Statement : लखनऊ सुपर जायंट्स संघाला कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा लखनऊ सुपर जायंट्स संघाचा या हंगामातील पाचवा पराभव ठरला आहे. या पराभवानंतर कर्णधार केएल राहुल भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान सामन्यानंतर त्याने पराभवाचं नेमकं कारण सांगितलं आहे.

या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला होता. प्रथम फलंदाजी करताना २० षटकअखेर ६ गडी बाद २३५ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊचा डाव १३७ धावांवर आटोपला.

LSG Playoffs Scenario: KKR विरुद्धच्या पराभवानंतर लखनऊचं टेन्शन वाढलं! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी करावं लागेल हे काम

या परभवानंतर बोलताना केएल राहुल  म्हणाला की, ' खूप जास्त धावा आणि अतिशय सुमार कामगिरी. आव्हान खूप मोठं होतं. जसं मी म्हणालो आम्ही गोलंदाजीत आणि फलंदाजीत चांगली कामगिरी करू शकलो नाही. पावरप्लेमध्ये नरेनने खूप प्रेशर टाकला. हा प्रेशर आमच्या गोलंदाजांना हाताळता आला नाही. हीच आयपीएलची मजा आहे. जगातील सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळताना तुमची खरी परीक्षा होते. खेळपट्टी चांगली होती. जर तुम्ही हार्ड लेंथवर चेंडू टाकला तर बाऊन्स मिळत होता.' असं केएल राहुल म्हणाला.

तसेच तो पुढे म्हणाला की, ' आमची फलंदाजी कमकुवत होती. आम्ही आधीच प्लान करतो. आम्ही विरोधी संघातील फलंदाजांबद्दल प्लान करतो. मात्र यावेळी आम्ही असं काहीच केलं नाही. आम्ही सुनील आणि जो कोणी फलंदाज चांगली कामगिरी करत होता त्याच्याविरुध्द गोलंदाजी करताना चुका केल्या.' या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्स संघाने २० षटकअखेर २३५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाला अवघ्या १३७ धावा करता आल्या.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply