Kishori Pednekar : छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगेन...; ईडीच्या चौकशीपूर्वी किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

Kishori Pednekar : कोविड बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी ईडीने मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना आज चौकशीसाठी बोलावले आहे. यादरम्यान किशोरी पेडणेकर यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली असून मी चौकशीसाठी जाणार असून यंत्रणांना सहकार्य करणार असल्याचे पेडणकर म्हणाल्या आहेत.

यंत्रणांचा चौकशीसाठी मला समन्स आला आहे. आता सरकारी यंत्रणांमध्ये राजकारण घुसलं आहे. पण त्यांना सहकार्य करणं आपलं कर्तव्य आहे. मुंबईची महापौर म्हणून केलेलं काम जगाने पाहिलं आहे. जवाब तो देनाही पडेगा, पण जवाब फक्त मीच नाही तर सर्वांनाच द्यावा लागेल. मी कुठेही विचलीत होणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत माझा जन्म झाला आहे. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगेन, जे सांगेन ते खरं सांगेन. कधीही कुठलंही चुकीचं काम केलं नाही हे त्रिवार सत्य आहे असेही किशोरी पेडणेकर यावेळी म्हणाल्या.

Thane Mumbra : “हिशोब होईल, ११ नोव्हेंबरला…”; संजय राऊतांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

आज पर्यंत भरपूर लोकांवर आरोप झाले. ते मंत्री झाले आहेत. त्यामुळे जे खरं आहे ते बाहेर येऊ देत. आम्ही काम करत असताना कोणी घोटाळा केला असेल तर ते समोर आलंच पाहिजे. मी सुद्धा मागणी करेल पण फक्त आरोप करून प्रेशर आणयचं आणि स्वतःची काम करून घेणं चालणार नाही, असेही पेडणीकर म्हणाल्या. तसेच नक्कीच यंत्रणांना सहकार्य करणार आणि चौकशीला जाणार असेही पेडणकर यांनी यावेळी स्पष्ट केलं

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply