Kirit Somaiya : अंबादास दानवेंनी सभापतींना दिला ८ तासांच्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह, सोमय्यांनी महिलांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप

Maharashtra Assembly Monsoon Session: भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या कथित अश्लील व्हिडिओच्या मुद्द्यावरून आज विधान परिषदेत विरोधक प्रचंड आक्रमक झाले. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या मुद्द्यावरून आक्रमक होत सोमय्यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप केला. तसेच सोमय्या यांच्या कथित ८ तासांच्या व्हिडिओचा पेन ड्राईव्ह त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे सोपवला.

सोमय्यांनी मराठी महिलांचा गैरफायदा घेतला - अंबादास दानवे

अंबादास दानवे म्हणाले, अनेकांना इडीची भीती दाखवून ब्लॅकमेल केलं जातंय, आठ तासांचे व्हिडिओ आहेत. ते मी सभापतींना देणार आहे. ही व्यक्ती महाराष्ट्र द्रोही आहे. मी त्यांचं नाव देखील सांगतो, किरीट सोमय्या असं या व्यक्तीचं नाव आहे. मराठी महिलांचा सोमय्यांकडून गैरफायदा घेतला गेला. सोमय्यांमुळे अनेकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे, त्यामुळे या प्रकरणाची सविस्तर चौकशी करावी असे म्हणत अंबादास दानवे यांनी किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला. यावेळी विरोधकांकडून सभागृहात 'लाव रे तो व्हिडिओ' अशी घोषणाबाजी केली. 

Pune : पुणे महापालिकेत समाविष्ट ३४ गावांना होतोय स्वच्छ पाणी पुरवठा.. मुख्यमंत्र्यांचा विधानसभेत निर्वाळा

व्हिडिओ खरा असल्याचे सोमय्यांनी अप्रत्यक्षपणे मान्य केले - अनिल परब

अनिल परब यांनी देखील या मुद्द्यावर देखील यांनी देखील या विषयावर बोलताना सोमय्या यांनी अनेकांना खोटे आरोप करून त्रास दिला आहे. असे असले तरी त्यांना त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही. परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी करावी. हवं तर एसआयटी नेमावी. व्हिडिओ खरा आहे, असं अप्रत्यक्षपणे सोमय्या यांनी मान्य केलं आहे, असे देखील ते म्हणाले.

सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल - देवेंद्र फडणवीस

या प्रश्नावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, या प्रकणी सोमय्या यांनी देखील माझ्याकडे पत्र पाठवून तक्रार केली आहे. तुमच्याकडे कोणाची तक्रार असेल तर माझ्याकडे द्या. या प्रकणाची सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीअंती कारवाई केली जाईल असे अश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply