KGF Chapter 2 ची बॉक्सऑफिसवर धूम; हिंदी व्हर्जनची कमाई पाहून व्हाल थक्क

बॉक्स ऑफिसववर सध्या कन्नड सुरस्टार यशच्या केजीएफ चॅप्टर २(KGF Chapter 2) चं वादळ आलंय असं म्हणातायत. दोनच दिवसात सिनेमाच्या हिंदी व्हर्जनसाठी १०० करोड पर्यंत पोहोचलेल्या या सिनेमानं आतापर्यंतचे बॉक्स ऑफिस कलेक्शनचे रेकॉर्ड तोडले आहेत असं देखील म्हणतायत. शुक्रवारी गुडफ्रायडे दिवशी सुद्धा केजीएफ ने हिंदी व्हर्जनच्या ग्राऊंडवर आपली जोरदार बॅटिंग सुरुच ठेवली. राजामौलींच्या RRR सोबत केजीएफ चॅप्टरची तुलना केली तर,केजीएफची प्रदर्शनाच्या दुसऱ्याच दिवशी जवळजवळ २३१ करोडची तिकीटं बॉक्सऑफिसवर विकली गेली. अशाप्रकारे या कन्नड सिनेमानं बॉक्सऑफिसवर आपला जम चांगलाच बसवायला सुरुवात केली आहे.

प्रशांत नील दिग्दर्शित या सिनेमात यश(Yash),रवीना टंडन आणि संजय दत्त सारखे कलाकार या सिनेमात आहेत. या सिनेमानं पहिल्याच दिवशी बॉक्सऑफिसवर तगडी कमाई करीत मोठमोठ्या सिनेमांना मागे टाकलंय. ट्रेड अॅनलिस्टच्या म्हणण्यानुसार, केजीएफ नं पहिल्याच दिवशी ८८ करोडची नेट कमाई केली आहे आणि भारतातलं शुक्रवारचं बॉक्सऑफिस कलेक्शन जवळजवळ १०३ करोडचं होतं. वीकेन्डला या सिनेमाकडून आता मोठ्या अपेक्षा आहेत. तसंही या आठवड्यात लागून ४ सुट्ट्यांचा वीकेन्ड आल्यानं सिनेमाला फायदाच झाला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply