Kesar Mango : खवय्यांसाठी खुशखबर..एपीएमसी फळ बाजारात केसर आंब्याची पहिली पेटी दाखल

New Mumbai : फळांचा राजा असलेल्या आंब्याचे सीजन पुढील एक- दीड महिन्यात सुरु होणार. यापूर्वीच अर्थात यंदाच्या हंगामातील केशर आंब्यांची पहिली पेटी आज मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात दाखल झाली आहे. कोकणातून आलेल्या यंदाच्या हंगामातील ही पहिलीच आंब्याची पेटी असून याची विधिवत पूजा करण्यात आली असून यंदा चांगला भाव मिळेल; अशी अपेक्षा येथील फळ व्यापाऱ्याने व्यक्त केली.

उन्हाळ्यात आंबाचे सीजन सुरु होत असते. मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जातीचा आंबा विक्रीसाठी बाजारात येत असतो. त्यातच केसर, हापूस आंब्याला अधिक पसंती राहत असून भाव अधिक असला तरी देखील हा आंबा खरेदी केला जात असतो. सीजन सुरु होण्यास काही दिवस बाकी असले तरी यंदाच्या हंगामातील केसर आंब्याची पहिली पेटी एपीएमसी फळ बाजारात दाखल झाली आहे.

पेटीची करण्यात आली पूजा आंबे खवाय्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात २०१५ हंगामातील पहिला आंबा दाखल झाला आहे. कोकणातील देवगड तालुक्यातील शेतकरी शकील मुल्ला यांच्याकडून केशर आंब्याची पहिली पेटी दाखल झाली आहे. बाजारात पेटी आल्यानंतर एपीएमसी बाजारात या आंब्याच्या पेटीची विधिवत पूजा करण्यात आली. तसेच सर्व व्यापाऱ्यांना पेठे देखील वाटण्यात आले.

Pune Crime : खळबळजनक! दारूसाठी पैसे न दिल्याचा राग, तरुणाने जिवलग मित्रालाच संपवलं

१६ हजारापर्यंत भाव मिळण्याची अपेक्षा

एपीएमसी फळ बाजारात दाखल झालेल्या आंब्याच्या पहिल्या पेटीला १५ ते १६ हजार रुपयांचा भाव मिळेल; अशी अपेक्षा यावेळी व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. यंदा हापूस आंब्या ऐवजी केशर आंब्याने हंगामाची सुरुवात झाली असून यंदा आंब्याचा हंगाम उशिराने सुरु होणार असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply