पुण्यातील शिवसेना नेता रघुनाथ कुचिक याच्यावर बलात्कारप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणातील पीडित मुलगी सध्या बेपत्ता असल्याचा दावा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. पण पुणे पोलीस ती मुलगी तिच्या वडिलांकडे सुखरुप असल्याची खोटी माहिती देत आहेत, असा गंभीर आरोप वाघ यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी त्या आज पुणे दौऱ्यावर आल्या आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
वाघ म्हणाल्या, अत्याचारानंतर पीडित मुलीला चार रुग्णालयांमध्ये गर्भपातासाठी नेण्यात आलं होतं. त्यातील मंगेशकर आणि हिरेमठ रुग्णालयात तिला नेण्यात आलं होतं या ठिकाणची चौकशी अद्याप बाकी आहे, तिथं पुणे पोलीस अजून गेलेलेच नाहीत. या पीडितेला रुग्णालयात ज्यांनी नेलं त्याचं नाव राहुल गोयल आणि राहुल बोरा असं आहे. राहुल गोयल हा रुबी हॉस्पिटलचा स्टाफ आहे. तर दुसरा राहुल बोरा याचा जबाब अद्याप घेण्यात आलेला नाही. मुलगी अद्याप गायब आहे, १६ तारखेला आरोपी कुचिकवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच या घटनेतील स्पॉट पंचनामे आणि इतर पुरावे सगळं देऊन सुद्धा आवश्यक गतीनं पोलीस या प्रकरणाकडं पाहत नाहीत, त्यांच्याकडून चालढकल सुरु आहे. पोलीस नक्की कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? असा सवालही यावेळी चित्रा वाघ यांनी केला.
पुणे पोलिसांकडून दिशाभूल करण्याचं काम
याप्रकरणी पुणे पोलिसांकडून दिशाभूल करण्याचं काम सुरु आहे. मुलगी वडिलांसोबत नाही, अशी माहिती मला स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. पण तरीही महिला आयोगाच्या अध्यक्षा मुलगी तिच्या कुटुंबियांसोबत असल्याचं सांगत आहेत. या प्रकरणात योग्य प्रकारे लक्ष न घातला बेताल वक्तव्य केली जात आहेत. मुलगी मिळालेली नाही, तीचे वडील त्यांच्या गावी आहेत. केवळ मुलीचं लोकेशन मिळाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे, असंही यावेळी चित्रा वाघ यांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी सत्ताधारी पक्षाचा आहे, त्यामुळं सरकारला हे प्रकरण गांभीर्यानं घ्यायचंच नाहीए का? असा सवालही त्यांनी विचारला.
वडगाव शेरीतील शाळेत मुलीवर झाला जीवघेणा हल्ला
वडगाव शेरीत एका शाळेत मुलीवर जीवघेणा हल्ला झाल्यानंतर मला आश्चर्य वाटतंय की, पुण्यात लागोपाठ मुलींवर अत्याचाराचं सत्र सुरु आहे. पण पुण्यात महिलांवरील गुन्ह्याचा आकडा खूपच वाढला आहे. निर्भया, दामिनी स्काड कुठे आहेत? यामध्ये शाळेनं पुढाकार घेणं गरजेचं होतं. माझ्या मुलीला त्रास दिला जातोय असं आम्ही शाळेला सांगितलं होतं, असं तिच्या वडिलांनी सांगूनही शाळेनं योग्य ती खबरदारी घेतली नसल्याबद्दल चित्रा वाघ यांनी खंत व्यक्त केली.हे पण वाचा-
शहर
- पनवेल: सिग्नल केबल चोरीचा प्रयत्न, लोकल सेवा दोन तास ठप्प; हजारो प्रवाशांचे हाल!
- यवतमाळमध्ये 'ऑपरेशन टायगर'! काँग्रेसला तोंडघशी पाडणारे साहेबराव कांबळे अखेर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ
- पुणे: विमानतळावर प्रवाशांचा खोळंबा: पुण्याहून दुबईला जाणारी स्पाइसजेटची विमानसेवा तासनतास लांबणीवर!
- पाटस गोळीबार प्रकरण! सिमेंट वाहतुकीच्या वादातून हाणामारी आणि फायरिंग; दोन्ही गटांतील १० आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडी!
महाराष्ट्र
- छत्रपती संभाजीनगर: पोहण्याचा मोह जीवावर; साई टेकडी तलावात बुडून तीन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत!
- शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर दुर्दैवी घटना: रायगडवरून घरी परतताना साताऱ्याच्या शिवभक्ताचा अपघाती अंत; शिवप्रेमींमध्ये शोककळा.
- पनवेल: सिग्नल केबल चोरीचा प्रयत्न, लोकल सेवा दोन तास ठप्प; हजारो प्रवाशांचे हाल!
- माणसानंतर आता जनावरांनाही 'लाईफस्टाईल' आजार; ५५ लाख बैलांना मधुमेह आणि हृदयविकाराचा विळखा!
गुन्हा
- बीड: 'माझ्याकडे तुझे फोटो, पळून आली नाहीस तर व्हायरल करीन'; परळीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, नराधम गजाआड!
- भाजप पदाधिकारी अजित आचरेकरला DRI कडून बेड्या; संजय राऊतांचा रवींद्र चव्हाणांवर गंभीर आरोप!
- नो ब्रोकर' ॲपवरील घराचा शोध पडला महागात! भाड्याच्या फ्लॅटच्या नावाखाली महिलेला दीड लाखांचा चुना; पवई पोलिसांत गुन्हा दाखल!
- मध्यप्रदेश: दारुड्या पित्याने मुलाला घराबाहेर उलटं लटकावलं, रागाच्या भरात आईने पतीला काठीने मारून संपवलं!
राजकीय
- सावंतवाडी भाजपला मोठा धक्का! अंतर्गत वादामुळे शहर अध्यक्ष आणि नगरसेविका मोहिनी मडगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे.
- महाराष्ट्राची मोठी भरारी! मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ४,०८० कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार.
- टीएमसीमध्ये मोठा भूकंप! २२ खासदार बंडाच्या तयारीत, ममता बॅनर्जींच्या पक्षावर अस्तित्वाचे संकट.
- भाजपला रामराम! के. अण्णामलाई यांची नवी राजकीय 'चळवळ'; आगामी निवडणुकीसाठी कंबर कसली!
इतर
- आजचे राशिभविष्य ६ जून २०२६ : या राशींना मिळणार नोकरीत प्रमोशन तर काहींचा वाढणार खर्च!
- सकाळी उठल्यावर ही ५ लक्षणं दिसली तर सावध व्हा! किडनी खराब होण्याचे असू शकतात संकेत
- मुंबई हादरली: डोकेडिया कुटुंब मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले; टरबूज नाही, तर 'उंदीर मारण्याचे विष' कारणीभूत?
- आजचे राशीभविष्य ५ जून २०२६: ग्रहांच्या आशीर्वादाने नशीब उजळणार, जाणून घ्या काय सांगतात तुमचे तारे!
मनोरंजन
- आयपीएल फायनल नंतर गुजरात टायटन्सला मोठा धक्का! टीम बसमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग; शुभमन गिलसह सर्व खेळाडू सुखरूप!
- अभिनेत्री यमुना हिच्या आयुष्यातील चढ-उतार आणि संघर्षाची कहाणी.
- "आरारारा खतरनाक…": 'मुळशी पॅटर्न २'ची घोषणा! हक्काच्या घराच्या संघर्षावर आधारित असेल नवा चित्रपट.
- "बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना 'घाटी' समजलं जातं"; वैभव मांगलेंचे बॉलीवूडवर अत्यंत खळबळजनक भाष्य!
विडियो गॅलेरी

पुणे आणि पिंपरी-चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाचा थरारक खुलासा
नसरापूर हादरलंय… आणि प्रत्येक आई-बापाच्या काळजात भीतीचं सावट दाटलंय! @punebatamya
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला वैचारिक दिशा देणारे महामानव…
देश विदेश
- दिल्ली: नीट (NEET) पेपर फुटीवरून 'कॉकरोच जनता पार्टी'चा अनोखा इशारा! अभिजीत दिपकेंचे आक्रमक आंदोलन, सरकारला दिले गंभीर परिणामांचे संकेत.
- BSNL ची मोठी क्रांती! अवघ्या ४२ रुपयांत पाहा ६०० हून अधिक LIVE टीव्ही चॅनल्स; इंटरनेट डेटाही खर्च होणार नाही!
- ओडिशा: इंजिनिअरच्या घरी 'कुबेराचा खजिना'! २ कोटींची रोकड, ३०० ग्रॅम सोने आणि १८ मालमत्ता; पाहून अधिकारीही चक्रावले!
- परकीय चलन वाचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना मोठे आवाहन! 'सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा, इंधन आणि सोनं खरेदी टाळा'


























Subscribe to my channel




