Kerala Court : भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी PFI च्या १५ जणांना मृत्युदंड, २०२१ मध्ये कुटुंबासमोरच केली होती हत्या

Kerala Court : केरळमध्ये झालेल्या भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी बंदी घालण्यात आलेल्या संघटनेच्या १५ जणांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. डिसेंबर २०२१ मध्ये अलप्पुझा जिल्ह्यात भाजपच्या ओबीसी शाखेचे नेते रंजीत श्रीनिवासन यांची त्यांची आई, पत्नी आणि मुलांसमोरच अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. दरम्यान आज अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश मावेलिक्कारा. वी. जी. श्रीदेववी यांनी सर्व आरोपींनी शिक्षा सुनावली. पीडिताच्या वकीलांनी दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली होती.

न्यायालयात सादर करण्यात आलेल्या अहवालात, भाजप नेते रंजीत श्रीनिवास यांच्या हत्येत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि सोशल डेमोक्रॅटीक पार्टी ऑफ इंडिया  संघटनेशी संबंधीत कार्यकर्त्यांचा समावेश होता. आरोपींनी १९ डिसेंबर २०२१ मध्ये रंजीत यांना त्यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबासमोर जबर मारहाण केली होती, यात त्यांचा मृत्यू झाला होता. पीडितांच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना, आरोपींनी श्रीनिवासन यांनी बचाव करण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना पकडून मारहाण करण्यात आली. त्यांच्या किंचाळण्याचा आवाड ऐकून त्यांचे नातेवाईक त्यांच्या मदतीसाठी धावून येत होते. मात्र त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचू दिलं नाही. अशा प्रकारची हत्या निर्दयी प्रकार असल्याचा दावा वकिलांनी केला होता.

Chandigarh Mayor Election : चंदीगड महापौर निवडणुकीत भाजपचा विजय; काँग्रेससोबत युतीकरूनही 'आप'ला धक्का

याआधी २० जानेवारीला न्यायालयाने सर्व १५ आरोपींना दोषी ठरवल होतं. ८ जणांना थेट हत्या प्रकरणात सामिल होते तर ४ चार जणांनी त्यांना मदत केली होती. घटनास्थळावर बाकीचे आरोपी धारधार शस्त्रांसह दाखल झाले होते. त्यामुळे न्यायालयाने सर्वांना या हत्येत दोषी ठरवलं आहे. दरम्यान भाजप नेत्यांनी न्यायालयाच्या या निर्णयामुळे श्रीनिवासन यांच्या कुटुंबाला न्याय मिळाला असल्याचं म्हटलं आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply