Kedarnath Temple Open : केदारनाथ मंदिर आजपासून भक्तांसाठी खुले, हर हर महादेवाच्या जयघोषात उघडले दरवाजे,

Kedarnath Temple Is Open For Devotees From Today : उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिर आजपासून भक्तांसाठी खुले झाले आहे. केदारनाथ धामचे दरवाजे आज सकाळी हजारो भाविक उपस्थित आणि हर हर महादेवच्या जयघोषा उघडण्यात आले. यावेळी शिवनामाच्या जयघोषाने केदारधाम दुमदुमून गेला होता. या खास प्रसंगानिमित्त केदारनाथ मंदिर परिसर 20 क्विंटल फुलांनी सजवण्यात आला होता. हे नयनरम्य दृष्य एएनआयने आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

आज सकाळी 6.20 वाजता मंत्रोच्चार आणि आर्मी बँडच्या मधुर सुरांनी मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. केदारनाथ मंदिराचे मुख्य पुजारी जगद्गुरू रावल भीम शंकर लिंग शिवाचार्य यांनी दरवाजे उघडले. यावेळी उपस्थित हजारो भाविकांनी मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर केदारनाथाचे दर्शन घेतले.

चारधाम यात्रेला सुरुवात

यासोबतच भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेल्या गंगोत्री, यमुनोत्रीचे दरवाजे उघडून उत्तराखंडमध्ये चारधाम यात्रेला सुरुवात झाली आहे. उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेसाठी भाविकांची नोंदणी अनिवार्य केली आहे. तुम्ही उत्तराखंड सरकारच्या वेबसाइटवर ऑनलाइन नोंदणी केली नसेल तर भाविक हरिद्वारच्या बसस्थानकाजवळील जिल्हा पर्यटन केंद्रावर जाऊन ऑफलाइनही नोंदणी करू शकता. यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.

१३ लाखांहून अधिक यात्रेकरूंची नोंदणी

उत्तराखंड सरकारने दिलेल्या माहितीनुसार चारधाम यात्रेसाठी आतापर्यंत १३ लाखांहून अधिक यात्रेकरूंनी नोंदणी केली आहे. कोरोना महामारीनंतर चारधाम यात्रेला सुरुवात झाल्यानंतर भाविकांच्या संख्येत वाढ झाल्याने उत्तराखंड सरकारही खूश आहे. या धार्मिक पर्यटनातून उत्तराखंड सरकारला चांगला महसूल मिळणार आहे.

हेलिकॉप्टरची सुविधा

तुम्हाला केदारनाथला जायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही हेलिकॉप्टरने केदारनाथ धामला भेट देऊ शकता. या कार्यक्रमाला 'हेली यात्रा' असे नाव देण्यात आले असून, त्याद्वारे प्रवाशांना हेलिकॉप्टरने केदारनाथ धामला नेले जाईल. सेरसी, फाटा, गुप्तकाशी येथून हेलिकॉप्टरची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आजपासून ही सेवा सुरू झाली आहे. प्रवासी IRCTC वेबसाइट http://heliyatra.irctc.co.in वर जाऊन तिकिट बुक करू शकतात. 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply