KDMC Water Supply : टँकर माफियांकडून जाणून-बुजून पाणीटंचाई?; ५०० लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात ३०० रुपये

KDMC Water Supply : डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावात श्रीराम नगर येथे पाणीटंचाईने नागरिक त्रस्त आहेत. कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागतेय. पाणी येत नसल्याने नागरिक टँकर मागवत आहेत. पाचशे लिटरमागे ३०० रुपये मोजावे लागत आहेत, त्यामुळे नागरिकांच्या खिशाला भुर्दंड पडत आहे. टँकर माफियांसाठी जाणून-बुजून पाणीटंचाई केली जाते का?, असा सवाल संतप्त नागरिकांकडून केला जातोय.

हा भाग मनसे आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघातील आहे. तर कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघात येतो. तसेच डोंबिवलीचे भाजप आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण हे मंत्री आहेत. तरीही नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ येत आहे. ही समस्या कधी सुटणार असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

Dhule News : दुकानाबाहेर मराठी पाट्यांसाठी मनसे आक्रमक; दुकानाबाहेर केले आंदोलन

स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असल्याचा दावा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. तर दुसरीकडे कल्याण डोंबिवली शहरातील नागरीक पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झालेत. महापालिकेचं नियोजन चांगलं नसल्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचं म्हटलं जातंय. डोंबिवलीतील आयरे गाव श्रीरामनगर परिसरात कमी दाबाने आणि अपुरा पाणी पुरवठ्यामुळे या परिसरात भीषण पाणीटंचाईची समस्या भेडसावतेय. या पाणी समस्याबाबत महिलांनी नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या निवेदन दिले. मात्र पाणी समस्या अद्याप सुटलेली नाही.

पाणी नसल्याने येथील नागरिक ५०० लिटर पाण्यासाठी तब्बल ३०० रुपये टँकरला मोजत आहेत.या ठिकाणी नागरीक पाण्यासाठी वणवण फिरत आहे. या परिसरातील महिलांनी महापालिकेकडे आपली व्यथा मांडण्यासाठी आल्या होत्या. सात वर्षापासून ही समस्या या नागरीकांना भेडसावत आहे. जाणून बुजून टँकर माफियांकरीता कमी दाबाचा पाणी पुरवठा केला जात आहे, अशी शंका उपस्थित केली जात आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply