Dombivli : तीन मावस भावांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, आज डोंबिवली बंद

Dombivli : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात निष्पाप २८ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये तीनजण डोंबिवलीतील होते. संजय लेले, हेमंत जोशी ,अतुल मोने या तिघांवर डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार श्रीकांत शिंदे भाजपा कार्याध्यक्ष व आमदार रवींद्र चव्हाण आमदार राजेश मोरे यांच्यासह हजारो डोंबिवलीकर देखील उपस्थित होते. तिघांच्या मृत्यूची बातमी समजताच डोंबिवलीकरांमध्ये संतापची लाट उसळलेली पाहायला मिळाली. काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे.

अंत्यसंस्कारादरम्यान बादशाह मैदान तसेच स्मशानभूमी बाहेर नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला . डोंबिवली शहरात जागोजागी हेमंत जोशी, संजय लेले, अतुल मोने या तिघांना श्रद्धांजली देण्यासाठी होर्डिंग लावण्यात आले आहेत. या हल्ल्याच्या घटनेच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे . सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आल्याची माहिती आहे . आज सकाळच्या सुमारास रिक्षा, बसेस चालू असल्या तरी हॉटेल दुकान सध्या तरी बंद असल्याचे दिसून येत आहे .

Pune : रस्त्यांवरील खोदकामामुळे ५० ठिकाणी कोंंडी, पोलिसांकडून ठेकेदारांविरुद्ध कारवाईचा इशारा

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील तीन जणांचा मृत्यू झाला होता. डोंबिवलीतील संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांच्या पार्थिवावर बुधवारी रात्री शिवमंदिर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या हृदयद्रावक प्रसंगी हजारो डोंबिवलीकरांनी उपस्थित राहून मृतांना अश्रूभिन अखेरचा निरोप दिला. मात्र या शोकसभेला संतापाचं स्वरूपही प्राप्त झालं. स्मशानभूमीबाहेर संतप्त नागरिकांनी दहशतवादाविरोधात घोषणाबाजी केली, तर काहींनी बॅनर जाळून आपला रोष व्यक्त केला.

अंत्यसंस्कारादरम्यान हेमंत जोशी यांना त्यांचे मेहुणे मोहित भावे यांनी अग्नी दिला. तर संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले याने आपल्या वडिलांना अग्नी देऊन अखेरचे कर्तव्य पार पाडले. अतुल मोने यांना त्यांची मुलगी ऋचा मोने हिने अग्नी दिला. या तिन्ही कुटुंबांवरील दुःखाचा डोंगर आणि शहरातील संतापाचं वातावरण यामुळे डोंबिवलीत तणावपूर्ण शांतता पसरली आहे. आज डोंबिवली बंदची हाक देण्यात आली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply