Kasba Peth Bypoll Election : कसबा बिनविरोध नाहीच! पोटनिवडणुकीसाठी काँग्रेससह, राष्ट्रवादीही रिंगणात?

पुणे : राज्यातील रिक्त झालेल्या विधानसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. दरम्यान कसबा पेठ पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुक्ता टिळक यांच्यानिधनानंतर काल निवडणूक आयोगाने ही पोटनिवडणूक जाहीर केली. मात्र ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक जाहीर होताच काँग्रेसने निवडणूक लढण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. परपरांगत हा मतदारसंघ काँग्रेसच लढवत आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असून ही जागा काँग्रेस लढवणार आहे.

दरम्यान कसबा पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसही दोन दिवसात निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. शनिवारी विरोधी पक्षनेते अजित पवार पदाधिकाऱ्यांसोबत याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणूक लढायची की नाही याबाबत चर्चा करणार आहेत.

परंपरागत कसबा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस लढवत आहे. त्यामुळे आघाडी धर्म पाळत काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की बिनविरोध करायची यावर चर्चा होणार आहे. काल निवडणूक आयोगाने कसबा विधानसभेची तसेच चिंचवड विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केली आहे.

तर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली ठोंबरे-पाटील यांनी कसबा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा काही दिवसांपूर्वी व्यक्त केली होती. मुक्ता टिळक यांच्या निधनाच्या अवघ्या 5 दिवसानंतर हा विषय निघाला त्यानंतर राष्ट्रवादीचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी या बाबत सूचना दिल्यानंतर हा विषय बंद झाला. दरम्यान काल पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने ही निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे. आता ही पोटनिवडणूक बिनविरोध होणार की महाविकास आघाडीतील पक्षातूनही उमेदवार उभे राहणार याकडे सर्वांचं लक्ष्य लागून असणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply