Kasba Bypoll Election : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उद्या अर्ज भरणार - नाना पटोले

Kasba Bypoll Election : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या काँग्रेस अर्ज भरणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे, त्यांनी टिळकांना डावललंय, त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रस्तावाला काहीही अर्थ नाही असे यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले.

नाना पटोले यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा मला फोन आला होता, कसब्याची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी त्यांची इच्छा होती. परंतु भाजपने त्यांचा उमेदवार जाहीर केला आहे आणि त्यांनी टिळकांना डावलले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावाला आता काही अर्थ नाही असे पटोले म्हणाले. मुख्यमंत्री एक बोलतात आणि फडणवीस त्याच्या विरोधात वागतात असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.

काँग्रेसचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही, परंतु उद्या उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहे. नाना पटोले यांना राज ठाकरे यांनी निवडणुक बिनविरोध व्हावी यासाठी लिहिलेल्या पत्राविषयी प्रश्न विचारल्यानंतर 'टिळकांच्या घरातला उमेदवार दिला गेला नाहीये, त्यामुळे कोणाची वकिली चालण्याचं कारण नाही', अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

नाना पटोले यांनी उद्योगपती अदानीविरोधात राज्यभर आंदोलन करणार असल्याची देखील माहिती दिली. त्यांनी सांगितले की, उद्या काँग्रेस महाविकासआघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी भरल्यानंतर अदानी विरोधात काँग्रेस आंदोलन करणार आहे.


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply