Kasaba Peth Bypoll Election : 'कसबा' बिनविरोध होणार? भाजपची कमान आमदार मिसाळांकडे

पुण्यात विधानसभेच्या दोन जागेंसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे राजकीय पक्ष सतर्क झाले असनू निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. पुण्याच्या माजी महापौर आणि भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोट निवडणूक होणार आहे. 

दरम्यान कसबा पेठ पोटनिवडणूक काँग्रेस लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसने आपली अधिकृत भुमिका जाहीर केली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे हे देखीप पक्ष इच्छुक आहेत. ही निवडणूक लढविण्याची तयारी महाविकास आघाडीकडूनही दर्शविली आहे. त्यानंतर भाजपकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. आता पुणे शहर भाजपकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी यासाठी भाजप सर्वपक्षांना आवाहन करणार आहे. भाजप (BJP)कडून याची जबाबदारी ही पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. मिसाळ या आता सर्वपक्षांच्या प्रमुख नेत्यांना ही पत्राद्वारे कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ,शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि पुण्यातील सर्वपक्षांच्या शहर अध्यक्षांना पत्र लिहून पुणे शहर भाजपच्यावतीने कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करावी असे आवाहन करण्यात आलं आहे.

देशाच्या राजकारणात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं अनन्यसाधारण स्थान आहे. विकासकामात राजकारण केले जात नाही. सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एकमेकांशी उत्तम प्रकारचे संबंध प्रस्थापित करतात. तसेच लोकप्रतिनिधीच्या निधनासारख्या दुःखद घटनेनंतर सर्वसंमतीने पोटनिवडणूक बिनविरोध होते.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय आमदार मुक्ता टिळक यांच्या दुःखद निधनामुळे पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. आता ही परंपरा कायम राखत कसबा मतदार संघाची निवडणूक बिनविरोध करावी अशी विनंती करणारे पत्र लिहिले आहे. बिनविरोध निवडणूक करणे हीच मुक्ता टिळकांना (Mukta Tilak) खरी श्रद्धांजली ठरेल असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply