Special Train : वारकऱ्यांसाठी खुशखबर! 'कार्तिकी' निमित्त पंढरपूरसाठी स्पेशल ट्रेन्स धावणार, प्रवासाचं टेन्शन मिटणार

Special Train : कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून भाविक पंढरपूर येथे दाखल होत असतात. विठ्ठलाचं वेळेवर दर्शन व्हावं, म्हणून भाविक मिळेल त्या वाहनाने प्रवास करतात. अशातच प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून विशेष रेल्वे गाड्यांचे नियोजन केले आहे. 

त्यामुळे वारकऱ्यांच्या प्रवासाचं टेन्शन मिटणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मिरज-कुर्डुवाडी, मिरज-पंढरपूर आणि पंढरपूर-मिरजदरम्यान २० ते २७ नोव्हेंबरपर्यंत ४ फेऱ्यांमध्ये या विशेष गाड्या धावणार आहे.

Uday Samant : महाराष्ट्रातील 215 आमदारकीच्या आणि लोकसभेच्या 45 जागा आम्ही सहज जिंकू - उदय सामंत

गाडी क्रमांक ०१४४३ पंढरपूर येथून सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी सुटणार आहे. ही गाडी मिरजेत दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी पोहचणार आहे. त्याच दिवशी मिरज-पंढरपूर-मिरज गाडी क्रमांक ०१४४४ मिरजेतून दुपारी १ वाजून १० वाजता सुटेल.

ही गाडी पंढरपूर येथे सायंकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी पोहोचेल. याशिवाय मिरज-पंढरपूर-मिरज ही विशेष रेल्वेगाडी २१ ते २५ नोव्हेंबर रोजी ४ फेऱ्यांत धावणार आहे. मिरज-पंढरपूर गाडी क्रमांक (०१४४५) मिरजेतून सकाळी ८ वाजता सुटेल व पंढरपूर येथे त्याच दिवशी सकाळी १० वाजून २५ मिनिटांनी पोहोचेल.

पंढरपूर-मिरज गाडी क्रमांक ०१४४६ पंढरपूर येथून सकाळी ११ वाजता सुटेल. मिरज येथे त्याच दिवशी दुपारी २ वाजता पोहोचेल. मिरज-कुर्डुवाडी-मिरज गाडी २१ ते २४ नोव्हेंबरपर्यंत चार फेऱ्यांत धावणार आहे. वारकऱ्यांनी वेळापत्रक पाहून तिकीटांची बुकिंग करावी, असं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply