Karnataka News : पोलिसांच्या ताब्यातील तरुणाचा मृत्यू; भडकलेल्या जमावाचा पोलीस स्टेशनवर हल्ला, ११ पोलीस जखमी

Karnataka News : कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील चन्नागिरीमधील आदिल नावाचा व्यक्तीचा पोलीस ठाण्यात संशयास्पद मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याचे नातेवाईक आणि त्याच्या परिसरातील लोक भडकले. या भडकलेल्या जमावाने पोलीस स्थानकावर दगडफेक करत आग लावली. शनिवारी ही घटना घडली. या घटनेत ११ पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती मिळाली होती.

कर्नाटकातील दावणगेरे जिल्ह्यातील आदिलच्या मृत्यूची वार्ता पसरल्यानंतर नातेवाईक आणि इतर लोक पोलीस स्टेशनजवळ जाऊन राडा केला. या जमावाने पोलिसांच्या वाहनांचं नुकसान केलं. तसेच दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला.

Dombivli Blast Case : डोंबिवली स्फोट प्रकरणाची मोठी अपडेट; अमुदान कंपनीच्या मालकाला ४ दिवसांची पोलीस कोठडी

आदिलच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. पोलिसांनी छळ केल्याने आदिलचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. आदिलच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबाकडे सोपवण्यात येईल.

पोलिसांकडून परिसरात नाकेबंदी सुरु आहे. आदिलच्या मृतदेहाचा पोस्टमार्टम हा मॅजिस्ट्रेटच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. पोलिसांनी नातेवाईकांनी केलेले आरोप फेटाळले आहेत. त्याच्या शरिरावर कोणतेही जखमेचे निशाण नाही. पोलिसांचा दावा आहे की, आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर ७ मिनिटात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेलं, डॉक्टरांनी उच्च रक्तदाबामुळे आरोपीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

नेमकं काय घडलं?

पोलीस अधीक्षक उमा प्रशांत यांनी सांगितलं की, 'काल आदिल नावाचा व्यक्तीला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केलं. आदिल पोलीस स्टेशनमध्ये सहा ते ७ मिनिटे देखील नव्हता. लोक पोलिसांवर आरोप करत आहेत. पोलीस स्टेशनमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. मृताच्या वडिलांची तक्रार नोंदविण्यात आली आहे. न्यायाधीशांच्या उपस्थितीत पोस्टमार्टम करण्यात येईल. पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यात ११ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर ७ वाहनांचं नुकसान झालं आहे. या प्रकरणी ३ एफआयआर नोंदविण्यात आले आहेत'.

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply