Karnataka New CM : अखेर ठरलं! सिद्धरामय्या होणार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री; DK शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद

Karnataka New CM: कर्नाटकात काँग्रेसचं बहुमत सिद्ध झालं झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावरुन दोन दिवसांपासून चर्चा रंगल्या होत्या. अखेर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय जाहीर झाला असून कॉंग्रेस हायकमांडने पुन्हा एकदा सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

डी. के शिवकुमार आणि सिद्धरामैय्या यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच सुरू होती. अखेर यामध्ये सिद्धरामैय्या यांनी बाजी मारली असून उद्या मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामैय्या यांचा शपथविधी होणार आहे..

सिद्धरामय्या मुख्यमंत्री...

याबाबत अधिक माहिती अशी की, चार दिवसांच्या प्रतिक्षेनंतर काँग्रेसने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे नाव अखेर निश्चित केले. पक्षाने सिद्धरामय्या यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. 

त्यानुसार, सिद्धरामय्या  हे कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री असतील. राहुल गांधी दुपारी 1 वाजता याची घोषणा करतील. डीके शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्री यांच्यासह ऊर्जा आणि पाटबंधारे आणि प्रदेशाध्यक्ष ही दोन खाती असतील. 18 मे रोजी शपथविधी सोहळा होणार आहे. दोन्ही नेते 10 मंत्र्यांसह शपथ घेणार आहेत.

मुख्यमंत्री पदाबाबत गेल्या चार दिवसांपासून बेंगळुरू ते दिल्लीपर्यंत अनेक बैठका झाल्या. या शर्यतीत सिद्धरामय्या आघाडीवर होते. तत्पूर्वी, रविवारी झालेल्या  काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सर्व आमदारांनी खरगे यांना नेता निवडीचे अधिकार दिले होते. यानंतर काँग्रेस अध्यक्षांनी निरीक्षकांना सर्व आमदारांशी वन टू वन चर्चा करण्यास सांगितले होते. त्यापैकी 80 हून अधिक आमदारांनी सिद्धरामय्या यांच्या बाजूने मतदान केले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply