Karnataka Election Result : 34 वर्षांनंतर काँग्रेसनं पुन्हा घडवला इतिहास; 1989 मध्ये तब्बल 178 जागांवर विजय

Karnataka Election Result 2023 : तब्बल ३४ वर्षांनंतर राज्यात पुन्हा एकदा काँग्रेसने (Congress Government) आपला विक्रम स्थापित केला आहे. १९८९ नंतर प्रथमच काँग्रेसने राज्यात १३६ जागा जिंकल्या आहेत.

राज्यात १९७८ मध्ये विधानसभेची सदस्य संख्या वाढवून २२४ इतकी निश्चित करण्यात आली होती. त्या वर्षाच्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसने १४९ जागेवर विजय संपादन केला होता. त्यानंतर १९८९ मध्ये झालेल्या निवडणुकीतकाँग्रेसने राज्यातील १७८ जागा जिंकत विक्रम प्रस्थापित केला होता. हा विक्रम आजही कायम आहे.

वीरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका झाल्या होत्या. त्यानंतर १९९९ साली मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने राज्यात १३२ जागा जिंकल्या होत्या, पण त्यानंतर कधी काँग्रेसला १३० जागांच्या पुढे मजल मारता आली नव्हती.

२००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने ६५ जागांवर विजय मिळविला होता. तर २००८ च्या निवडणुकीत काँग्रेसला ८० जागांवर समाधान मानावे लागले होते. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसने १२२ जागांवर विजय संपादन करत स्पष्ट बहुमत मिळविले होते. राज्यात सत्तेवर आल्यानंतर काँग्रेसमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर काँग्रेसला सत्तेवरून पायउतार व्हावे लागले. आता पुन्हा एकदा राज्यातील जनतेने काँग्रेसला स्पष्ट बहुमत देत १३६ जागांवर विजय मिळवून दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply