Karad Gang : 'या' ४ धारदार हत्याराने संतोष देशमुखांचा जीव घेतला, 'कराड गँगकडून' खास हत्यारं तयार, १५० वार करून देशमुखांना काळं निळं केलं अन्..

Karad Gang : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण बीड पेटून उठलं होतं. या प्रकरणी सीआयडी आणि एसआयटीने दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. आरोपींचे फोटो आणि व्हिडिओ पाहून बीडच्या ग्रामस्थांची तळ पायाची आग मस्तकात गेली.

आता देशमुखांची हत्या करण्यासाठी वापरण्यात आलेल्या हत्यारांचे फोटो आणि परिक्षण अहवाल समोर आला आहे. चार विशेष हत्यारांचा वापर करून देशमुखांची हत्या झाली असं अहवालात नमूद करण्यात आलेले आहे.

९ डिसेंबर २०२४ रोजी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली होती. या घटनेत त्यांच्यावर चार विशेष हत्यारांनी अमानुष मारहाण करण्यात आली होती. या हत्यारांची निर्मिती कराड गँगने खास हत्येसाठी केली असल्याची माहिती समोर आली आहे. या हत्यारांचा वापर करून आरोपींनी देशमुखांचा छळ करून त्यांची हत्या करण्यात आली होती.

SSC-HSC Exam : दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! पुणे बोर्डाने केली मोठी घोषणा

वापरलेली चार विशेष हत्यारे

गॅस पाईप

गाडीच्या क्लच वायरचा धातूचा चाबूक

लाकडी बांबूची काठी

लोखंडी पाईप

या चार विशेष हत्याराने सरपंच देशमुख यांना मारहाण झाली. हल्ल्यानंतर त्यांच्या अंगावर १५० जखमा आढळून आल्या होत्या. तपास यंत्रणेने हत्यारांची कल्पनाचित्र रेखाटून दोषारोपपत्रातून सादर केले होते. आरोपींनी यापूर्वी इतर व्यक्तींना याच हत्याराने मारहाण केल्याची देखील धक्कादायक माहिती समोर आली आहे.

याशिवाय तीन डॉक्टरांच्या वैद्यकीय पथकाने दिलेल्या अहवालात या हत्यारामुळे मारहाण झाल्यास मृत्यू होऊ शकतो असे नमूद केले आहे. याच धक्कादायक वास्तवाची पुष्टी करणारा वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट आता साम टीव्हीच्या हाती आला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply