Karad Bus Fire News : मुंबईला निघालेल्या बसने पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर अचानक घेतला पेट, प्रवासी सुखरुप

Karad Bus Fire News : पुणे- बंगळुर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे टोलनाक  दरम्यान खासगी लक्झरी बसला भीषण आग  लागली हाेती. या बसचा टायर फुटल्यामुळे आग लागल्याचे प्रथमदर्शी निदर्शनास येत आहे. सुदैवाने या घटनेत काेणतीही जिवीतहानी झालेली नाही अशी माहिती पाेलीसांनी दिली.

पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसारकोल्हापूरहून मुंबईच्या दिशेने निघालेली या बसला आज (गुरुवार) पहाटेच्या सुमारास आग लागली. या घटनेची माहिती कळताच घटनास्थळी तळबीड पोलीस तात्काळ मदतीसाठी दाखल झाले.

SIT For Disha Salian Case : आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ; दिशा सालियान प्रकरणी सरकारकडून ठाकरेंची SIT चौकशी

पाेलीसांनी बसमधील प्रवाशांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. त्यामुळे भेदरलेला प्रवाशांच्या जिवात जीव आला. आग लागलेल्या बसला विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाेहचल्या.

या घटनेत बस पूर्ण जळून खाक झालेली. या घटनेमुळे तासवडे टाेलनाका नजीकची वाहतुक काही काळ विस्कळीत झाली हाेती. तळबीड पाेलीस घटनेची चाैकशी करीत आहेत

 



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *