Kanhaiyalal Murder Case : उदयपूर : कन्हैया हत्याकांडाचं 'पाक कनेक्शन'; NIA च्या आरोपपत्रात कराचीतील दोघांची नावं!

उदयपूर : देशात गाजलेल्या कन्हैयालाल हत्या प्रकरणात पाकिस्तानी कनेक्शन असल्याचं सिद्ध झालंय. एनआयएनं (NIA) सादर केलेल्या आरोपपत्रात पाकिस्तानातील दोघांची आरोपी म्हणून नावं आहेत.

या प्रकरणात मुख्य आरोपी रियाज मोहम्मद आणि गौस मोहम्मद यांच्यासह 11 आरोपींची नावं आहेत. जयपूरच्या विशेष न्यायालयात सादर केलेल्या आरोपपत्रात एनआयएनं सांगितलं की, 'कन्हैयालालची हत्या ही पूर्णपणे दहशतवादी घटना होती, जी देशभरात भीती पसरवण्यासाठी करण्यात आली.'

एनआयएनं उदयपूरमधील नऊ आरोपींव्यतिरिक्त पाकिस्तानातील कराची शहरात राहणाऱ्या दोन लोकांनाही आरोपी बनवलंय. कन्हैयालालच्या हत्येप्रकरणी पाकिस्तानी आरोपींची भूमिका काय होती, हे सध्या तरी स्पष्ट झालेलं नाही. मात्र, हे आरोपी सोशल मीडियावरील अनेक ग्रुपमध्ये अॅक्टिव्ह होते आणि भडकाऊ संदेश पाठवत असल्याचं स्पष्ट झालंय. कन्हैयालाल हत्याकांडातील अन्य नऊ आरोपीही याच गटात सामील होते.

माहितीनुसार, एनआयएनं जयपूरच्या विशेष न्यायालयात भारतीय दंड संहितेच्या कलम 120B, 449, 302, 307, 324, 153(A), 153(B), 295(A) 16, 18 अंतर्गत UA (P) कायदा आणि 20 अंतर्गत आरोपपत्र सादर केलंय. यासोबतच शस्त्रास्त्र कायद्याचं कलम 4/25 (1B) देखील लागू करण्यात आलंय.

एनआयएनं दाखल केलेल्या कन्हैयालाल खून खटल्यातील आरोपींपैकी मुख्य आरोपी मोहम्मद रियाज, मोहसीन खान, मोहम्मद रफिक, वसीम अली, एजाज मोहम्मद, मोहम्मद जावेद, मोहम्मद मोहरम आणि मुस्लीम खान उर्फ ​​रझा, शेर मोहम्मद यांच्याशिवाय कराचीतील रहिवाशी सलमान आणि अबू इब्राहिम यांनाही आरोपपत्रात आरोपी करण्यात आलंय.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply