Kamya Kartikeyan: मुंबईची १६ वर्षीय काम्या कार्तिकेयन ठरली माउंट एव्हरेस्ट सर करणारी देशातील सर्वात तरुण गिर्यारोहक

Kamya Kartikeyan : माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणे ही खूप अवघड गोष्ट आहे. माउंट एव्हरेस्ट शिखर सर करताना इच्छाशक्ती, ताकद याचा पुरेपूर वापर करावा लागतो. अशीच इच्छाशक्ती मनात ठेवून मुंबईत शिकणाऱ्या काम्या कार्तिकेयनने वयाच्या १६ व्या वर्षी माउंट एव्हरेस्ट सर करुन विक्रम केला आहे.

काम्या कार्तिकेयनने नेपाळच्या बाजूने माउंट एव्हरेस्ट सर केला आहे. हे शिखर सर करणारी काम्या देशातील सर्वात तरुण मुलगी आहे. तिच्या या विक्रमाची नोंद अनेकांनी घेतली आहे. काम्याने याआधीही अनेक विक्रम केले आहेत.

Nagpur News : सीताबर्डी बाजारपेठेत ४ जूनला बॉम्ब ठेवण्याची धमकी, नागपूर पोलीस आणि तपास यंत्रणांची उडाली तारांबळ

काम्या ही कुलाब्यातील नौदल शाळेत शिकते. तिने वयातच्या सातव्या वर्षापासूनच गिर्यारोहणाला सुरुवात केली. तिने आतापर्यंत जगातील अनेक उंच शिखरे सर केली आहेत. दक्षिण अमेरिकेतील माउंट अकॉनगुआ हे शिखर सर करणारी सर्वात तरुण गिर्यारोहक म्हणून काम्याने आपले नाव कोरले आहे. तर टांझानियातील माउंट किलीमांजारे सर करणारी आशियातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली आहे.

काम्या खूप दिवसांपासून माउंट एव्हरेस्ट सर करण्याची तयारी करत होती. या सगळ्यात तिला तिचे वडिल कमांडर एस कार्तिकेयन यांनी खूप साथ दिली. काम्याचे वडिल हे नौदलात कमांडर ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. तर आई लावण्या या नौदल शाळेच्या प्रमुख आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply