Kalyan Politics : 'श्रीकांत शिंदे यांचा फोटो बॅनरवर लावणार नाही'; भाजप-शिंदे गटातील धुसफूस वाढली

Kalyan Politics : विकासकामांचे श्रेय ,आमचा निधी शिंदे गटाचे पदाधिकारी लाटतात. अनेक दिवसांपासून हे सुरू आहे. मात्र हा त्रास आता सहनशीलतेच्या पलीकडे गेला आहे. यापूढे आम्ही पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्मात श्रीकांत शिंदे यांचा फोटो वापरणार नाही. खासदार शिंदे यांच्याकडून होणाऱ्या त्रासाची तक्रार आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांना करणार आहे, असा निर्णय मलंग गड भाजप पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या बैठकीत घेतला आहे. या बैठकीला फोटो देखील व्हायरल झाला आहे. त्यामुळे शिंदे गट आणि भाजपातील धुसफूस वाढत असल्याचे दिसून येत आहे.

खासदार शिंदेंकडून भाजप आमदारांना त्रास, पदाधिकाऱ्यांचा आरोप

उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यात भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड याच्यावर गोळीबार गेला. या घटनेमुळे एकच खळबळ माजली. आमदार गायकवाड हे पोलीस कोठडीत आहेत.

Uttarakhand Crime News : उत्तराखंड दंगलीमध्ये ५० पोलीस जखमी; दंगलखोरांना दिसताक्षणी गोळ्या घाला, सरकारचे आदेश

यानंतर मलंगगड विभागात पदाधिकाऱ्यांनी आमदार गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराचे आम्ही समर्थन करीत नाहीत. मात्र त्यांना गोळीबार करण्याची वेळ का आली या मागची कारणे नेमकी काय आहेत. हे समजून घेतले पाहिजे. खासदार शिंदे यांच्याकडून भाजप आमदारांना त्रास होता. भाजप कार्यकत्यांना त्रास दिला जात होता, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांकडून होत आहे.

आमदार, जिल्हा परिषद सदस्य आणि ग्रामपंचायत समितीकडून आलेला आणि मंजूर झालेला विकास निधी हा भाजपच्या पाठपुराव्यामुळे प्राप्त झाला होता. हा निधी नागरी विकास कामे करण्याकरीता मिळाला होता. मात्र खासदार या मंजूर कामांचे श्रेय घेत होते, असाही आरोप भाजप पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला.

खासदार शिंदे यांचा फोटो बॅनरवर लावणार नाही, पदाधिकाऱ्यांचा निर्णय

'भाजपच्या लोकप्रतिनिधींनी मंजूर केलेल्या विकास कामांच्या ठिकाणी खासदारांकडून फलक लावले जात होते. त्या विकास कामांचे भूमीपूजनही खासदारांचे पदाधिकारी करीत होते. त्यामुळे यापुढे कोणत्याही कार्यक्रमाच्या बॅनरवर खासदारांचा फोटो वापरायचा नाही. त्यांच्याकडून भाजप लोकप्रतिनिधी आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला जाणाऱ्या त्रासाची तक्रार पक्षाच्या वरिष्ठांकडे करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply