Traffic Police : वाहतूक विभागाचा पोलिसांनांच शिस्तीचा धडा; नो पार्किंग मध्ये उभ्या पोलिसांच्या दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Kalyan : असे म्हटले जाते की कुठलेही काम करताना आपल्या घरापासून सुरुवात करावी याचा प्रत्यय कल्याण वाहतुक विभागाच्या कारवाईत दिसून आला आहे. शिवाय पोलिसांना नियम नसतात का? असा प्रश्न नेहमीच उपस्थित करत नियम मोडणाऱ्या पोलिसांवर कारवाई का नाही? असे म्हटले जात असते. मात्र कल्याण वाहतूक विभागाने नो पार्किंगमध्ये उभ्या केलेल्या पोलिसांच्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करत शिस्तीचा धडा दिला आहे.

कल्याण स्थानक परिसरात नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या असते. यामुळे वाहनधारक त्रस्त होत असतो. बेशिस्त रिक्षावाले, मोठी वाहने त्याच प्रमाणे दुचाकी बेशिस्तपणे पार्किंग करणारे महारथी यामुळे नेहमीच हा परिसर वाहतूक कोंडीचा विळख्यात असतो. यात भर म्हणजे या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांकडूनही दुचाकी बेशिस्तपणे पार्क केलेल्या असतात. त्यामुळे मोठी वाहतुक कोंडी होत असते.

पोलिसांच्या गाडीवर दंडात्मक कारवाई

यावर जालीम उपाय करत कल्याण वाहतूक पोलिसांनी पोलिसांच्याच पार्क केलेल्या दुचाकी वाहनावर कारवाई करत चलन मारले आहे. स्टेशन परिसरात नो पार्किंग मध्ये उभ्या करण्यात आलेल्या पोलिसांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आता दंडात्मक कारवाई करण्यात आलेल्या पोलिसांना देखील वाहतूक विभागाकडे दंड भरावा लागणार आहे.


शिस्त लावण्याचा प्रयत्न

यापूर्वी फक्त सामान्य नागरिकांच्या वाहनावर कारवाई होत असल्याच्या तक्रारी येत होत्या. पण आता वाहतूक पोलिसांनी आपल्याच पोलीस खात्याला शिस्त लावन्याचा प्रयत्न वाखण्याजोगा आहे. यानंतर अशी कारवाई सुरू राहील अशी अपेक्षा वाहतूक पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. या कारवाईमुळे स्टेशन परिसरात वाहतूक कोंडी पासून दिलासा मिळण्यास मदत होणार आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *