Kalyan News : विना तिकीट म्हणून पकडलं, गांजा तस्कर निघाला; उच्चशिक्षित तरूणाला पोलिसांकडून बेड्या

Kalyan News : विना तिकीट प्रवास करत असल्यामुळं रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकानं तरूणाला पकडलं. पण त्याची झडती घेतली असता, त्याच्याजवळ साडे तीन किलो गांजा सापडलाय. भावेश गायकवाड असे तरूणाचे नाव असून, तो तरूण भुवनेश्वर एक्सप्रेसमधून अंबरनाथ रेल्वे स्थानकाजवळ आला होता. अधिक तपास केला असता, भावेश गायकवाड हा उच्चभ्रू कुटुंबातील असून, वाईट संगतीमुळे गांजा विकत असल्याचं समोर आलं. या प्रकरणी भावेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. तसेच त्याला कल्याण रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाला एक तरूण विना तिकीट प्रवास करत असल्याची माहिती मिळाली. तरूणाची अधिक झडती केली असता, त्याच्याकडून साडे तीन किलो गांजा आढळला. विना तिकीट प्रवास करत असल्यामुळे त्याची झडती घेतली असता, गांजा तस्कर तरुणाचे बिंग फुटले. भावेश गायकवाड असे तरूणाचे नाव असून, तो मोहपाडा खालापूर जिल्हा रायगड येथील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे.

Naxal Encounter : मोठी बातमी! १९ नक्षलवाद्यांचा खात्मा, एक कोटीचं बक्षीस असणाऱ्यालाही टिपलं

भावेश गायकवाड एका उच्चभ्रू कुटुंबातील आहे. त्याने हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण पूर्ण केले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने कॅफे सुरू केला होता. मात्र, वाईट संगतीमुळे भावेश नशेच्या आहारी गेला. त्यानंतर त्याचा कॅफे बंद पडला. त्याने सोन्याचे दागिने गहाण ठेवले. नशेच्या आहारी त्याने सर्व काही गमावले. सर्व काही गमावल्यानं पैशांची गरज भासली.

त्यामुळे भावेश गांजा तस्करीकडे वळाला. कल्याण रेल्वे पोलिसांनी याप्रकरणी भावेश विरोधात गुन्हा दाखल केला असून, त्याला बेड्या ठोकल्या आहेत. भावेश विरोधात याआधी देखील असे काही गुन्हे दाखल आहेत का? त्याने गांजा कुठून आणला होता? तो कोणाला विकणार होता? याचा तपास कल्याण रेल्वे पोलीस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply