Kalyan News : मराठी तरूणाला परप्रांतीय फेरीवाल्यांकडून मारहाण; मनसे कार्यकर्त्यांनी चोपून काढले

Kalyan News : मुंबईच्या मुलुंडमधील मराठी आणि गुजराती भाषिक वाद ताजा असताना कल्याणमध्ये मराठी बोलण्यावरून नवा वाद झालाय. कल्याणमध्ये मराठी बोलण्यावरून एका तरुणाचा परप्रांतीय फेरवाल्यांशी वाद झाला. त्यानंतर या फेरीवाल्यांनी मराठी तरुणाला मारहाण केल्याची घटना घडली. यानंतर या वादात मनसेने उडी घेत फेरीवाल्यांना चोप दिला आहे. कल्याण रेल्वे स्टेशनच्या स्कायवॉकवर ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

PMPML Bus Service : पीएमपीएमएलच्या फेऱ्या वाढवा, मावळातील प्रवाशांची मागणी

काय आहे प्रकरण?

वाशिंदमधील एक विद्यार्थी कल्याणमधे काही कामानिमित्त आला होता. घरी परतत असताना रेल्वे स्टेशनवरील स्कायवॉक वर असलेल्या एका फेरीवाल्याकडून एक वस्तू घेतली. या तरुणाला वस्तू थोडी खराब वाटल्याने फेरीवाल्याला पुन्हा दिली. पण फेरीवाल्याने पैसे परत देण्यास नकार दिला.

या फेरीवाल्याने या तरुणाला 'तुम्ही मराठी लोक असेच आहात, असं बोलला. या विद्यार्थ्याने माझ्या भाषेवरून बोलू नका, असं मनसे कार्यकर्त्यांकडे जाईल असं सांगितलं. मात्र, त्यानंतर तीन ते चार फेरीवाल्यांनी या तरुणाला मारहाण केली.

या तरुणाने या घटनेबाबत मनसे कार्यकर्त्यांना सांगितलं. मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ स्कायवॉकवर धाव घेतली. त्यानंतर या मनसे कार्यकर्त्यांनी त्या चार-पाच फेरीवाल्यांना शोधून चांगलाच समाचार घेतला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मराठी भाषेचा मराठी तरुणाचा अपमान सहन करणार नाही, असा इशाराही मनसे कार्यकर्त्यांनी दिला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply