Kalyan Durgadi Killa : शिवरायांनी बांधलेल्या दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला;

Kalyan Durgadi Killa : राज्यातील अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशातच कल्याणमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कल्याणमधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याचा बुरुज ढासळला आहे. गुरुवारी (ता. १३) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे.

सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. किल्ल्याचा बुरुज ढासाळल्याचं कळताच पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांसह शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी पुराततत्व विभागाकडून या किल्ल्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यानेच किल्ल्याची सातत्याने पडझड होत असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केला.

Buldhana News : बुलढाण्यात संगणक टंकलेखन परीक्षेत घोटाळा उघड, केंद्रावर न जाता विद्यार्थी बाहेरून देत होते परीक्षा

मुख्यमंत्र्यांनी किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी 25 कोटीचा निधी देण्याचे मान्य केले होते. त्यामधील पहिल्या टप्प्यात साडेबारा कोटीचा निधी मंजूर झाला. मात्र आचारसंहितेमध्ये निधी न मिळाल्याने दुरुस्तीचे काम पूर्ण होऊ शकले नाही, असं शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले.

हा निधी लवकरात लवकर मिळायला हवा जेणेकरून किल्ल्याच्या दुरुस्तीचे काम पूर्ण करता येईल, अशी मागणी देखील रवी पाटील यांनी केली. या किल्ल्यावर दुर्गा देवीचं मंदिर असून येथे अनेक भाविक दररोज दर्शनासाठी येतात. त्यातच अचानक किल्ल्याचा बुरुज ढासाळल्याने हिंदु बांधवांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

स्वराज्याच्या आरमाराचं एक केंद्र म्हणून कल्याण येथील दुर्गाडी किल्ल्याची ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला बांधला होता. विस्तीर्ण खाडी परिसर आणि त्यालाच लागून किल्ला उभारण्यात आला होता. पण मागील अनेक दिवसांपासून या किल्ल्याची दुरावस्था होत असल्याचं समोर येत आहे.

त्यामुळे किल्ल्याची देखभाल दुरुस्ती करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केले जाते आहे. पाच वर्षांपूर्वी देखील किल्ल्याचा बुरुज ढासाळला होता. आता या घटनेनंतर तरी किल्ल्याला पुरेसा निधी मिळून दुरुस्तीचे काम पूर्ण होईल का, असा प्रश्न शिवप्रेमी विचारत आहेत.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply