Kalyan Dombivali Municipal Corporation : केडीएमसीची 42 वर्षांत पहिल्यांदाच विक्रमी कर वसुली,622 कोटींचा टप्पा पार

Kalyan Dombivali Municipal Corporation : कोवीड काळापासून काहीशा आर्थिक गर्तेत सापडलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेला यंदाच्या रेकॉर्ड ब्रेक वसुलीमुळे दिलासा मिळाला आहे. यंदाच्या वर्षी केडीएमसीच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या रूपाने 31 मार्च 2024 पर्यंत तब्बल 622 कोटींहून अधिक रकमेची भर पडली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उत्पन्नाचे मदार हे मालमत्ता व पाणीपट्टी करावर अवलंबून असते . दरवर्षी जेमतेम उद्दिष्ट घटना महापालिकेला यश येते. त्यात कोविड काळानंतर महापालिकेचे आर्थिक परिस्थिती देखील जेमतेम होती.

ATM Crime News : हातचलाखीने एटीएमची अदलाबदली करत लुबाडणूक; अंतरराज्य गुन्हेगारांना अटक

सन 2020-21 या कोवीड काळात महापालिकेच्या इतिहासात त्यावेळी पहिल्यांदाच 400 कोटींचा टप्पा पार केला. परंतु यंदाच्या वर्षी तर या कर वसुलीने त्याचा रेकॉर्ड ब्रेक करत त्याही पुढचा 600 कोटींचा टप्पा गाठला आहे.

कल्याण डोंबिवली स्थापनेपासून आजपर्यंत गेल्या 42 वर्षांत इतक्या मोठ्या संख्येने कर वसुली झाली आहे. केडीएमसीने यावर्षी आपल्या दहा प्रभागात मिळून तब्बल 622 कोटींपेक्षा अधिकची करवसुली केली आहे.

केडीएमसीच्या ब आणि ई या दोन्ही वॉर्डांनी मिळून 240 कोटींची भर घातल्याचे एकंदर आकडेवारीवरून दिसून येत आहे. तर 622 कोटींच्या मालमत्ता करासोबतच पाणीपट्टीचीही 74 कोटी 72 लाखांची रक्कम केडीएमसीच्या तिजोरीत जमा झाली असल्याची माहिती मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे - कुलकर्णी यांनी दिली. या रेकॉर्ड ब्रेक कर वसुलीमुळे आर्थिक गर्तेत सापडलेला कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाला दिलासा मिळाला असून विकास कामांना चालना मिळण्यास मदत होणार आहे असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला.

प्रभाग क्षेत्रनिहाय झालेला करभरणा

A वॉर्ड - 87 कोटी 91 लाख

B वॉर्ड - 112 कोटी 66 लाख

C वॉर्ड - 61 कोटी 34 लाख

D वॉर्ड - 35 कोटी 54 लाख

E वॉर्ड - 128 कोटी 99 लाख

F वॉर्ड - 33 कोटी 52 लाख

G वॉर्ड - 28 कोटी 66 लाख

H वॉर्ड - 47 कोटी 39 लाख

I वॉर्ड - 54 कोटी 65 लाख

J वॉर्ड - 28 कोटी 18 लाख

3 कोटी हस्तांतरण कर

Edited By : Siddharth Latkar



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply