Kalyan Crime News : महेश गायकवाड गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण, गणपत गायकवाडांच्या मुलाला क्लिनचीट

Kalyan Crime News : हिललाईन पोलीस ठाण्यात महेश गायकवाड यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर राज्यात संतापाची लाट उसळली. तत्कालीन भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांनी हा गोळीबार पोलीस ठाण्यात केला होता.

६ राऊंड फायर करत त्यांनी महेश गायकवाड यांना जखमी केलं होतं. या प्रकरणात गणपत गायकवाड अजूनही तुरुंगात आहेत. पण या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आलं आहे.

गणपत गायकवाड यांचा ज्येष्ठ पुत्र वैभव गायकवाड याला क्लिन चिट देण्यात आली आहे. उल्हासनगर कोर्टात पुरवणी चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. ज्यात फक्त २ आरोपींचा समावेश आहे. नागेशर बडेराव आणि कुणाल पाटील.

Erandol Accident : शिर्डीवरून परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात; महिलेचा मृत्यू, पतीसह तीन मुले गंभीर

चार्जशीटमध्ये नमूद केल्यानुसार, वैभव गायकवाड याच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळून आलेले नाहीत. त्याचा या गुन्ह्यात कोणताही सहभाग नाही, असं चार्जशीटमध्ये स्पष्ट करण्यात आलंय. मात्र, अद्याप वैभव गायकवाड फरार असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

२५ हजारांजे बक्षिस देण्याची घोषणा

मागच्या महिन्यात महेश गायकवाड यांनी मोठी घोषणा केली होती. या घोषणेची चर्चा सर्वत्र झाली होती. 'वैभव गायकवाड यांना पकडून देणाऱ्या व्यक्तीला २५ लाख रूपयांचे बक्षिस देण्यात येईल', अशी घोषणा महेश गायकवाड यांनी केली होती. गुन्ह्यातील आरोपी आमदाराच्या निवासस्थानी जात असल्याचा आरोप महेश गायकवाड यांनी केला होता.

पोलीस राजकीय दबावाखाली काम करत असून, वैभव गायकवाडला अद्याप अटक झालेली नाही. त्यांना पकडून देणाऱ्या पोलिसांना २५ हजार रूपयांचे बक्षिस दिले जाईल, अशी घोषणा माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी केली होती.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply