Kalyan Crime : जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला, भांडण सोडवण्यास गेलेली तरुणाची आईही जखमी; घटना सीसीटीव्ही कॅमे-यात कैद

Kalyan Crime : जुन्या वादातून काही तरुणांनी एका तरुणावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याण जवळील वरप गावात घडली. धक्कादायक म्हणजे या भांडणात तरुणाला वाचवण्यास गेलेली तरुणाच्या आई देखील जखमी झाली आहे. हा संपूर्ण मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेतील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी टिटवाळा पोलिस ठाण्यात मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार आणि फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनूसार कल्याण जवळील वरप गावात नेहाल परवेज हा तरुण आपल्या कुटुंबासह राहतो. नेहालचे काही तरुणांसोबत काही महिन्यांपूर्वी भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून बुधवारी रात्रीच्या सुमारास काही तरुण नेहाल याच्या घरात जबरदस्ती घसुले.

Pune Porsche Car Accident : ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार प्रकरण, ससूनमधील महत्वाची कागदपत्र पोलिसांकडून जप्त

या तरुणांनी नेहालला मारहाण करण्यास सुरुवात केली. नेहालवर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला गेला. या हल्ल्यात नेहाल गंभीर जखमी झाला. धक्कादायक म्हणजे यावेळी नेहालची आई भांडण सोडवण्यास गेली असता तिच्यावर देखील या तरुणांनी हल्ला केला. या हल्ल्यात नेहाल व त्याची आई गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत .मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply