Kalyan Crime : आजीच्या पेन्शनसाठी नातेवाईक भिडले, बँकेतच केला चाकूहल्ला; दोघे जखमी

Kalyan Crime :आजीच्या पेन्शनवरून बँकेत नातेवाईकांनी राजा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कल्याणच्या पश्चिमेला असलेल्या बँक ऑफ बडोदामध्ये पेन्शनसाठी नातेवाईक एकमेकांमध्ये भिडले. यावेळी बँकेमध्येच चाकू हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामध्ये दोघे जण जखमी झाले आहेत. बँकेच्या बाहेर रक्त पडले आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

आजीच्या पेन्शनच्या पैशांवरून नातेवाईकांनी बँकेतच भिडले. यावेळी झालेल्या वादातून एका गटाने दुसऱ्या गटावर चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याण मधील बँक ऑफ बडोदा शाखेत घडली. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर आरोपी हल्लेखोर हे फरार झाले असून कल्याण पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

Ajit Pawar Speech : 'लोकसभेला जोरदार झटका लागला, चूक झाली', अजित पवारांनी नाशिकच्या शेतकऱ्यांची माफी मागितली; नेमकं काय म्हणाले?

कल्याणमध्ये राहणारे राहुल परमार, विजय परमार यांची आजी सेवानिवृत्त झाली. त्यांच्या पेन्शनचे पैसे बँकेत आले. दोघे परमार भाऊ आजीच्या पैशांसाठी बँकेत पोहोचले. बँकेतून पैसे काढण्यास गेले असता त्या ठिकाणी आजीच्या भावाची नातवंड प्रथमेश चव्हाण, नाथा चव्हाण आणि मयूर चव्हाण त्या ठिकाणी पोहोचले. आजीच्या पैशांवर आमचा देखील हक्क आहे. आम्हाला पैसे हवेत असे त्यांनी सांगितले. यावरून दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा झाला.

बँकेचे कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करत दोन्ही गटांना शांत करून बँकेच्या बाहेर पाठवलं. मात्र बँकेच्या गेटवर पुन्हा या दोन्ही गटात वाद झाला. त्यात तिघांनी दोघांवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात राहुल परमार आणि विजय परमार हे दोघे गंभीर जखमी झाले. या प्रकरणातील तिघे हल्लेखोर फरार झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच बाजारपेठ पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply