Kalyan Bus Accident : बसचा ब्रेकफेल झाला अन् संरक्षक भिंत तोडून बस कोसळली गाड्यांवर

Kalyan Bus Accident : खासगी बसचा ब्रेक फेल होऊन एका सोसायटीची संरक्षक भिंत तोडून बस थेट गाड्यांवर कोसळल्याची घटना कल्याण पश्चिमेत घडली आहे. यामध्ये सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. मात्र दोन ते तीन गाड्यांचे नुकसान झाले असल्याची माहिती खडकपाडा पोलिसांनी दिली.

कल्याण पश्चिमेच्या गोदरेज हील परिसरात गोदरेज हिल परिसरात सोसायटीच्या रहिवाशांसाठी खासगी ट्रॅव्हल्सकडून बस चालवली जाते. गुरुवारी संध्याकाळी गोदरेज हीलवरून खाली उतरत असताना या मार्गावर असणाऱ्या एका वळणावर हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. खाली येत असताना अचानक बसचे नियंत्रण सुटले आणि खाली असणाऱ्या मलबारी सोसायटीची संरक्षक भिंत तोडून ही बस तिथल्या गाड्यांवर कोसळली.

बसचा ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जात आहे. सोसायटीतील 2-3 गाड्यांचे नुकसान झाले आहे. मात्र सुदैवाने यामध्ये कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती खडक पाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एस. पाटील यांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply