Kalyan Accident: कल्याणमध्ये विचित्र अपघात, रिक्षाला धडक देऊन डंपर उल्हास नदीत कोसळला, महिलेचा जागीच मृत्यू; दोघे बेपत्ता

Kalyan : कल्याणच्या गांधारी पुलावर विचित्र अपघात झाला. भरधाव डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. रिक्षाला धडक देऊन डंपर पुलाचे कठडे तोडून उल्हास नदीत कोसळला. या भीषण अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. नदीत कोसळलेल्या डंपरचा चालक आणि अन्य एक जण बेपत्ता झाला आहे. अग्निशामक दलाकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. कल्याण पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम येथील गांधारी पुलावर आज सकाळीच्या सुमारास भीषण अपघात झाला. रिक्षाला धडक देऊन डंपर पुलावरून उल्हास नदीत कोसळला. अपघातात रिक्षातून प्रवास करणाऱ्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी व्यक्तीला कल्याणच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या अपघातामुळे पुलावर वाहतूक कोंडी झाली होती.

Jayant Narlikar Passes Away : तेजस्वी तारा हरपला, खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे पुण्यात निधन

आज सकाळी सहा ते सात वाजताच्या सुमारास बापगाववरून निलेश वानखेडे हा रिक्षचालक आपल्या रिक्षातून आईला कल्याणला घेऊन येत होता. त्याच दरम्यान गांधारी पुलावर डंपरने रिक्षाला जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये रिक्षाचालकाची आई मंगल वानखेडे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षाचालक निलेश गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात एवढा भीषण होता की अपघातामध्ये रिक्षाचा चक्काचूर झाला आहे.

रिक्षाला धडक दिल्यानंतर डंपर गांधारी पुलाचा कठडा तोडून उल्हास नदीत कोसळला. डंपर नदीमध्ये कोसळल्यानंतर डंपरचा चालक आणि आणखी एक व्यक्ती बेपत्ता झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच कल्याण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दले वाहतूक पोलिस आणि स्थानिक पोलिसांकडून नदीत रेस्क्यू करण्याचे काम सुरू करत त्यांचा शोध घेतला जात आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply