Kalyan : कपडे व्यापाराच्या नावाखाली खाली बनावट दारूची तस्करी; १६ लाखांच्या बनावट दारू जप्‍त

कल्‍याण : राज्य उत्पादन शुल्क कल्याण विभागाने धडक कारवाई करत १६ लाखांच्या बनावट दारूसह चाळीस लाखांचे महागडी बीएमडब्ल्यू गाडी जप्त केली आहे. ही दारू दमन, हरियाणा येथून महाराष्ट्रात आणली जात होती. कपड्याच्या व्यापाराच्या आड ही बनावट दारूची तस्करी केली जात असल्याचे तपासात उघड झाले आहे. 

कल्याण एक्साईज विभागाने बनावट दारूचे २९१ बॉक्स व एक बीएमडब्ल्यू गाडी असा ५६ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामधील एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. संदीप दावानी असे अटक आरोपीचे नाव असून या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दीपक जयसिंधानी हा फरार असून एक्साईज विभाग त्याचा शोध घेत आहे.

भिवंडी येथील पडघा रोड देवरुंग येथे एका गाळ्यात दमन, हरियाणा येथील तसेच बनावट मद्य साठा असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभाग ठाणे, राज्य उत्पादन शुल्क विभाग कल्याण, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक ठाणे या पथकाने या ठिकाणी कारवाई करत मद्य साठ्याचे एकूण २६६ बॉक्स जप्त केले. हा तपास सुरू असताना कल्याणमधील वरटेक्स या हाय प्रोफाईल इमारतीच्‍या पार्किंगमधील एका गाडीमध्ये मद्य साठा असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीनुसार पथकाने या इमारतीतील पार्किंगवर छापा टाकत सदर गाडीतील विदेशी मद्याचे एकूण २५ बॉक्स जप्त केले.

मुख्य सूत्रधार दीपक जयसिंधानी त्याचा साथीदार संदीप दावानी यांच्या मदतीने दमन, हरियाणा येथील विदेशी मद्य तसेच बनावट विदेशी मद्य विना परवाना बेकायदेशीर महाराष्ट्रात आणत विक्री करत होता. धक्कादायक बाब म्हणजे हे मद्य आणताना हे दोघं कपड्याच्या व्यापारी असल्याचे भासवत होते. त्यांच्याकडे पावत्या देखील सापडल्या आहेत. कपड्यांच्या गोण्यांमध्ये मद्याच्या बाटल्या लपवून महाराष्ट्रात आणली जात असल्याचे उघडकिस झाले.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply