Kalachowki Fire : मुंबईतील काळाचौकी परिसरात भीषण आग; एकापाठोपाठ ८ सिलिंडर फुटले,

Kalachowki Fire : मुंबईच्या काळचौकी परिसरातील मिंट कॉलनीमध्ये भीषण आग लागल्याची माहिती आहे. एकापाठोपाठ एक ८ गॅस सिलिंडरच्या स्फोटानंतर ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

मागील काही दिवसांपासून मुंबईतील अनेक भागात सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. त्यातच आज मुंबईतील  काळाचौकी परिसरातील मिंट कॉलनी येथे ७ ते ८ घरगुती गँस सिलिंडरचे स्फोट झाल्याने भीषण आग लागली आहे. आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

Pune News : पुणे महापालिकेला हवेत ९५ कोटी; घन कचरा कृती योजनेसाठी केंद्राकडे मागणी

नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. सर्वत्र आरडाओरड आणि पळापळ सुरू आहे. काळाचौकी परिसर दाटीवाटीचा असल्याने आगीतून बचावासाठी नागरिक घराबाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे १० बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत.

आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती आहे. बचावकार्यासाठी महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. सिलिंडरचा स्फोट कशामुळे झाला, याचे कारण अद्यापही गुलदस्तात आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply