K. Kavita : लाच प्रकरणात बीआरएस नेत्या के. कविता सहभागी

K. Kavita : दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी विशेष न्यायालयाने आज भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) नेत्या के.कविता यांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीमध्ये २६ मार्चपर्यंत वाढ केली आहे. दक्षिणेतील लॉबीने ‘आप’ला या प्रकरणात शंभर कोटी रुपयांची लाच दिली होती त्याप्रकरणातील के.कविता या महत्त्वाच्या आरोपी असल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे.

ईडी’ने आज कविता यांना पाच दिवसांची कोठडी ठोठावण्यात यावी अशी मागणी केली होती. चौकशी प्रक्रियेदरम्यान कविता यांना न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अहवाल देखील दाखविण्यात आले होते त्यात त्यांनी स्वतःच मोबाईल फॉरमॅट करून डेटा डिलिट केल्याचे दिसून येते. त्यांच्या फोन कॉलचा डेटा पडताळून पाहिला जात असल्याचे ‘ईडी’कडून न्यायालयामध्ये सांगण्यात आले. कविता यांच्या भाच्याने वापरलेला मोबाईल देखील तपाससंस्थेने जप्त केला असून त्याची देखील चौकशी होऊ शकते.

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांना हायकोर्टाचा धक्का; तात्काळ सुनावणी करण्यास दिला नकार

याआधी त्याला चौकशीसाठी बोलाविण्यात आले होते पण तो त्यावेळी हजर राहिला नव्हता असे ‘ईडी’ने म्हटले आहे. कविता यांनी स्वतःचे आणि कुटुंबीयांच्या व्यवसायाची कागदपत्रे आपण सादर करू असे म्हटले होते पण नंतर त्यांनी कागदाचा एक तुकडाही सादर केला नसल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे. या प्रकरणात काही दिवसांपूर्वी तपाससंस्थेने कविता यांना अटक केली होती.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply