Jitendra Awhad Resign : शरद पवारांच्या राजीनाम्याचे पडसाद; जितेंद्र आव्हाड यांचाही राजीनामा

Jitendra Awhad Resign: शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्याचे पडसाद उमटू लागेल आहे. राष्ट्रवादीच्या जवळपास सर्वच नेत्यांना शरद पवार यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. मात्र शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचं बोललं जात आहेत.

शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राजीनामा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. लोकांना मनातील निर्णय घ्यावं, अशी विनंती जितेंद्र आव्हाडांनी केली आहे.

ठाण्यातील सर्वच पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

जितेंद्र आव्हाडांसह ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना राजीनामा पाठवला जाणार आहे.

अमरावती राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा राजीनामा

राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष संगीता ठाकरे यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संगीता ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांच्याकडे पाठवला आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्ष पदाबाबत पुनर्विचार करण्याची मागणी त्यांनी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply