Jitendra Awhad : सरकारने ‘तो’ निर्णय घ्यावा, आम्ही सगळे आमदार दिल्लीत जायला तयार; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?

Jitendra Awhad : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. आरक्षण दिलं जात नाही तोवर एक इंचही मागे हटणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. याच मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्र्वादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली भूमिका मांडली आहे. लोकसभेत जाऊन 16 टक्के वाढवून घ्यावं. त्यासाठी आम्ही राष्ट्रवादीचे सर्व आमदार दिल्लीला जायला तयार आहोत. विधानसभेतील 288 आमदार दिल्लीला तयार आहोत. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशी आमची आग्रहाची भूमिका आहे, असं  जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

कंत्राटी भरतीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यावरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातमध्ये गेलेली इंडस्ट्री आम्ही पुन्हा आणू. कोण बेरोजगार आहे त्यांना नोकरी मिळून देऊ, असं सरकार का नाही बोलत? कॉन्ट्रॅक्ट लेबरला जगातून विरोध आहे जगातील कॉन्ट्रॅक्टर लेबर हे शोषण आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. सरकारला पैसे वाचवायचे असतील म्हणून तरुण पोरांचे जीव घेणं, योग्य नाहीये, असंही जितेंद्र आव्हाड म्हणालेत.

Gram Panchayat Election : आता उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी; बंडखोरीमुळे स्थानिक नेते काळजीत

Jitendra Awhad : कॉन्ट्रॅक्ट लेबलच्या विरोधात तरुणांमध्ये रोष आहे. याची सुरुवात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी केली, असं बोललं जात आहे. पण पहिली गोष्ट शरद पवारसाहेबांचा याच्याशी काय संबंध? काहीही झालं की शरद पवार यांचं नाव घेतात. जो जीआर निघाला त्याची अंमलबजावणी झालीच नाही. कारण लोकांनी त्याला विरोध केला आणि हा जीआर जेव्हा निघाला. तेव्हा ते स्वतः मंत्री होते त्याचा शरद पवार यांचा या निर्णयाशी काय संबंध? आता जे नऊ मंत्री शरद पवार साहेबांना सोडून गेले त्यांनी ही जबाबदारी स्वीकारावी, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे.

ज्यांनी तुम्हाला मंत्री बनवलं त्यांना तुम्ही प्रश्न विचारता लाज वाटत नाही का? लोकांच्या विरोधामुळे तुम्हाला हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. तर यामध्ये शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना कशाला घेता? कारण नसताना शरद पवार यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली जातेय. त्यांना प्रश्न विचारायचे तुम्हाला लाज वाटत नाही का? आपलं वय काय आहे? आपली उंची किती? आपला अनुभव किती? त्यांनी केलेला आपल्यावरती उपकार किती याचा विचार करा, असं म्हणत अजित पवार गटातील नेत्यांनी जितेंद्र आव्हाड यांनी सुनावलं आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply