Jejuri Khandoba Temple : आता जेजुरीच्या खंडोबा मंदिरातही ड्रेस कोड, देवस्थानाकडून 'या' कपड्यांवर बंदी

Jejuri : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर येणाऱ्या भाविकांसाठी महत्वाची बातमी आहे. जेजुरीच्या खंडोबा मंदिरातही ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. आजपासून वस्त्र संहिता लागू करण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला असून तसेच त्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.

यापुढे खंडोबा मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय वेशभूषा परिधान करणे आवश्यक असेल. भारतीय वेशभूषा असेल तरच भाविकांना मंदिरामध्ये प्रवेश मिळेल असा निर्णय श्री मार्तंड देव संस्थान आणि जेजुरीच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला आहे. पुरूष आणि महिला भाविकांना मंदिरांत तोकड्या कपड्यांमध्ये प्रवेश मिळणार नाही, असंही स्पष्ट करण्यात आले आहे.

Pune Crime : टोळक्याकडून निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; तलवारी उगारुन घरातील साहित्याची तोडफोड

फॅशन म्हणून वापरण्यात येणाऱ्या फाटक्या जीन्स, बरमुडा, शॉर्ट, स्कर्ट असा आणि तत्सम कपडे घालून देव दर्शनास गडावर येण्यास मज्जाव केला जाणार आहे. त्यामुळे आता जेजुरी गडावर खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना अंगावर पूर्ण आणि व्यवस्थित कपडे परिधान करूनच दर्शनासाठी यावे लागणार आहे.

मंदिरात येताना मंदिराचे पावित्र्य जपले जावे यासाठी राज्यभरातील अनेक मंदिरांमध्ये ड्रेसकोड जारी करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ आता पुणे जिल्ह्यातल्या जेजुरी येथे असणाऱ्या खंडोबा मंदिरामध्ये देखील ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यातील ५२८ मंदिरामध्ये वस्त्र सहिंता लागू करण्यात आली आहे. मंदिराचे पावित्र्य जपाने हाच आमचा उद्देश असून यासाठी लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन देवस्थान समितींकडून करण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply